Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 5228

९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू

Bachhu Kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेले काही महिने राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबर पासून महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनीही आता दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात घ्यावयाच्या सर्व नियम व अटींचे पालन करुनच हे वर्ग सुरु केले जातील असे सांगितले आहे.

राज्यातील संचारबंदी आता हळूहळू उठविण्यात आली असून, सर्व कामकाज हळूहळू सुरळीत केले जात आहे. जवळपास सर्वच गोष्टी आवश्यक नियमांसह सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र बालमंदिरे आणि विद्यामंदिरे तसेच माध्यमिक शाळा अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाही आहेत. विद्यार्थ्यांचे या कालावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. म्हणूनच या पार्श्वभूमीवर आता ९ वी पासून १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शाळा सुरु करत असताना आवश्यक ती सर्व काळजी घेण्यासाठी सरकारच्या वतीने एक धोरण आखण्यात येईल. या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोना बाधित होणार नाही तसेच विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळेल अशी सरकारची भूमिका आहे. असे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले. जर एखाद्या शिक्षकाचे वय ५० च्या पुढे असेल तर अशा शिक्षकाच्या जागी दुसऱ्या शिक्षकाला घेता येईल का सोबतच आजारी तसेच बाधित मुले शाळेत येवू नयेत यासाठी सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या चाचण्या करता येतील का, यावरही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

शरद पवारांनी आखातीतील मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या योजेनवर केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आखाती देशांतील अनिवासीय भारतीयांच्या विविध संघटनांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळण्यासाठी अनिवासी मराठी भारतीयांची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत चर्चा झाली. “नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध आहेत.” असे त्यांनी यावेळी या संघटनांना त्यांना सांगितले.

याबरोबरच अनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता व Land Bank सुविधा, गुंतवणूक रकमेइतका परतावा देणारे आर्थिक प्रोत्साहन, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही देण्यात आली.

या सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचे तसेच [email protected] या ई-मेलद्वारे मैत्री कक्षाशी संपर्क साधता येण्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. आखाती देशांमधून परत आलेल्या अनिवासीय भारतीयांच्या कौशल्याचा व अनुभवाचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येऊ शकेल, या प्रश्नावर चर्चा करताना, “महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकासात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अनिवासीय भारतीयांना त्यांच्या कौशल्यानुरूप अनेकविध रोजगाराच्या संधी उपलब्ध असून महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.” यावर चर्चा करण्यात आली.

आखाती देशांमधून परत येणाऱ्या अनिवासीय भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी काही योजना उपलब्ध असल्याची, या योजनांच्या व्याप्तीबाबतची, कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. परत येणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे शिक्षण, अशा नागरिकांच्या मुलांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्ग जर आखाती देशामधील स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर इथे शिकवलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो का, यासंदर्भातील त्यांच्या शंकेचे निरसन करत त्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्द यावेळी पवार यांनी त्यांना दिला.

कोरोना महामारीचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, शेती क्षेत्राला आर्थिक चालना व गती देण्यासाठी अनिवासीय भारतीय कशाप्रकारे मदत व सहभाग घेऊ शकतील या प्रश्नासहित शेतीपूरक उद्योग, कोंबडीपालन, दूध व्यवसाय इ. विक्री नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत त्यांच्या शेतमालाच्या सुयोग्य बाजारपेठेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत मराठी अनिवासी भारतीयांना केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

गुंतवा १ हजार रुपये आणि मिळावा दिड लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया सातत्याने आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. आताही बँकेने एक उत्तम योजना आणली आहे. आता एसबीआयातील बचत खात्यासह इतर अनेक नवीन योजनांचा लाभ ग्राहक घेऊ शकणार आहेत. दरम्यान ग्राहक एसबीआयच्या आरडीच्या योजनेचाही लाभ घेऊ शकणार आहेत. या योजनेअंतर्गत कमी गुंतवणूक करून अधिक पैसे जोडता येणार आहेत.

एसबीआयच्या आरडीसाठी आपण मात्र १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. या गुंतवणुकीतून आपण साधरण १.५० लाख रुपये जोडू शकता. एसबीआयमध्ये आपण एका ते १० वर्षापर्यंत आरडी करू शकता. एक ते दोन वर्षाच्या आरडीवर १० टक्के व्याज मिळते. तीन ते ५ वर्षाच्या आरडीवर ३० टक्क्यांनी व्याज मिळते. ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ४० टक्के व्याज मिळते. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत १ ते २ वर्षाच्या आरडीवर ५.६० टक्के व्याज मिळते. तर ३ ते ५ वर्षाच्या आरडीवर बँक ५.८० टक्के व्याज देते. यासह ५ ते १० वर्षाच्या आरडीवर ६.२० टक्के व्याज मिळते.

एसबीआयच्या आरडीमध्ये प्रत्येक महिन्याला १००० रुपयांची गुंतवणूक केल्यास या गुंतवणूकीत १० वर्षापर्यंत एक हजार रुपये आपल्या खात्यात जमा करावे लागतील. यावर मिळणाऱ्या व्याजानुसार, ४० टक्क्यांच्या हिशोबानुसार १० वर्षात १.५० लाख रुपये मिळणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

आता उसापासून होईल इथेनॉल निर्मिती, ज्याने कमी होईल पेट्रोल डिझेलची आयात

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही राज्यातील उसाचे क्षेत्र वाढले असून भविष्यात साखरेचे उत्पादन कमी करुन २५ टक्के ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात यावा या विषयावर आज साखर क्षेत्रातील विविध तज्ज्ञांसोबस अनौपचारिक चर्चा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांसह इतर संबंधित खात्याचे प्रमुख मंत्रिमंडळात निर्णय घेतील, अशी माहिती वसंतदाद साखर संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे दिली. साखर उद्योग आणि इथेनॉल निर्मिती धोरणाबाबत विविध घटकांची बैठक पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली.

‘यंदा झालेल्या पावसामुळे पुढच्या वर्षी पुन्हा उसाचे क्षेत्र वाढून ऊसाच्या गाळपाचा प्रश्न समोर येईल, यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही चर्चा आणि प्रयत्न करत होतो. आता या निष्कर्षाशी आलोय की, साखरच केली पाहीजे असे काही नाही. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या गरजेइतकी आणि त्याहून अधिक साखर असून आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेच्या किमतीला मर्यादा आहेत. म्हणून अधिक साखर उत्पादन करण्या ऐवजी २५ ते ३० टक्के साखरेचे उत्पादन आपण कमी करुन त्याच ऊसापासून इथेनॉल शकलो, तर पेट्रोल आणि पेट्रोलियम पदार्थाची आयात करावी लागते. यातील आयातीचा वाटा आपण इथेनॉल मिश्रणाने कमी करु शकतो, यासाठी आम्ही काही दिवस अर्थकारणावर अभ्यास करत होतो.” असे शरद पवार म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचे धोरण राबविण्याचे सांगितले आहे. या धोरणाचा इथेनॉल निर्मितीच्या अर्थकारणासोबत अभ्यास करण्यात आला आहे. धोरण परडवणारे आणि अनुकूल आहे, असा निष्कर्ष निघाला आहे. हे धोरण देशासह राज्याचीही गरज आहे. यासर्व बाबींचा विचार करुन २५ ते ३० टक्के ऊस इथेनॉल उत्पादनासाठी वापरावा, हा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. यावर राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेईल असेही पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

बीट खा निरोगी राहा ; जाणून घेऊया बीट खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Beatroot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाजारात सहज उपलब्ध होणारे आणि सामन्यांना परवडणारे सलाड यामध्ये बीटाचा समावेश होतो. बऱ्याच वेळा सलाड खाताना त्यात काकडी,गाजर यांच्यासोबतच बीटही दिले जाते. मात्र बीट पाहून नाके मुरडणारे अनेक जण आहेत. त्यांना बीटाचे फायदे माहित नसतात. तर अशा सर्वांसाठी बीट खाण्याचे फायदे जाणून घेवूयात.

एखाद्या पदार्थाला नैसर्गिक लाल रंग आणायचा असेल तर त्यामध्ये बीटाचा वापर केला जातो. बीटामुळे पदार्थाला अत्यंत सुंदर रंग येतो. त्याचप्रमाणे अनेक गृहिणी बीटापासून वेगवेगळे पदार्थदेखील करत असतात. यामध्ये बीटाचा हलवा, बीटाची कोशिंबीर, बीटाची बर्फी असे अनेक पदार्थ आहेत. विशेष म्हणजे नावडतीचं हे बीट अत्यंत पौष्टिक असून ते खाण्याचे काही गुणकारी फायदे आहेत.

घशात जळजळ होत असल्यास बीटाचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. बीट खाल्ल्यामुळे आम्लपित्त, पित्त होणे या समस्या दूर होतात. बीट खाल्ल्याने पोट साफ होते आणि बद्धकोष्ठता तसेच मूळव्याधीच्या समस्येवरही आराम मिळतो. तसेच रसक्षयावर आराम मिळतो, थकवा दूर होतो, हातापायांमध्ये ताकद येते, वजन कमी होते, दिर्घकाळचा पांडू विकार बरा होतो, बीटामुळे शरीरातील ताकद वाढते. आपल्या रोजच्या आहारात बीटाचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होवू शकतो. मात्र याचा विशिष्ट गोष्टीसाठी उपयोग करत असताना वैद्यकीय सल्ला नक्की घेतला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

फक्त हव्यासापोटी मोदी सरकार सोन्याची अंडी देणाऱ्या सरकारी कंपन्या विकतेय- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र । केंद्रातील मोदी सरकार सध्या निर्गुंतवणूकीकरणाला चालना देत आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा केंद्र सरकार विकायला काढत आहे. यात आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडिया तर नफ्यात असलेल्या भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान मोदी सरकारच्या या निर्गुंतवणूकीकरण धोरणाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोध दर्शविला आहे. सोशल मीडियावर याबाबत एक सविस्तर पोस्ट लिहत मोदी सरकाराच्या खाजगीकरणाच्या धोरणाचा लेखाजोखा त्यांनी यात मांडला आहे. ”नफ्यात असणाऱ्याही कंपन्या विकताना सरकार मागं-पुढं बघत नाही. सरकारी कंपन्या या महसुलाच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत, परंतु हव्यासापोटी या कंपन्यांचं खाजगीकरण करून सोन्याची अंडी देणाऱ्या कंपन्या केंद्र सरकार कापताना दिसतंय अशा शब्दात रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
”केंद्र सरकारकडून एअर इंडिया पासून तर भारत पेट्रोलियम पर्यंत सर्वच सरकारी मालकीच्या कंपन्यांचं पद्धतशीरपणे खाजगीकरण करण्याचं धोरण मोठ्या वेगाने सुरुय. केंद्र सरकार या प्रक्रियेला निर्गुंतवणूकीकरणाचं गोंडस नाव देण्यात आलं असलं तरी हे प्रत्यक्षात मात्र हे केंद्र सरकारच्या आर्थिक डबघाईचं आणि ठराविक खाजगी कंपन्यांना रान मोकळं करण्याचं धोरण आहे.

ऑर्डीनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी) संदर्भात आर्मीचा एक रिपोर्ट आला असून ९६० कोटी रु किंमतीचा दारुगोळा नित्कृष्ट दर्जाचा असल्याने मोठं नुकसान झालं असल्याचं म्हटलंय. एवढ्या रकमेत आपल्याला १०० हॉवित्झर तोफा घेता आल्या असत्या. तसंच वेळेवर पुरवठा न होणे, वारंवार अपघात होणे यासारख्या समस्या असल्याचं आणि २०१४ पासून दर आठवड्याला दारुगोळा संबंधित एक तरी अपघात झाला असल्याचं या अहवालात नमूद केलंय. वास्तविक ओएफबी हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं, ओएफबीची उत्पादने जर कार्यक्षम नसतील किंवा सदोष असतील तर मग संरक्षण मंत्रालय काय करतं, हा प्रश्न निर्माण होतो. सरकारी उपक्रमाचं पद्धतशीरपणे खाजगीकरण करण्याचं धोरण बघता केंद्र सरकार जाणून बुजून तर ओएफबी कडे दुर्लक्ष करत नाही ना, ही शंका येतेय.

ओएफबीचं कॉर्पोरेटायझेशन करणं म्हणजे खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. ओएफबी मध्ये गुणवत्ता, क्षमता यासारख्या अडचणी असतील तर त्यावर अभ्यास करून त्या सोडवता येऊ शकतात. आज ओएफबी चे ४१ कारखाने असून ९ प्रशिक्षण संस्था आहेत, तसंच ८० हजार एवढा मोठा कामगार वर्ग आहे. १९६२, १९७१ च्या युद्धांमध्ये ओएफबी निर्मित आयुधांची भूमिका महत्वपूर्ण राहिलीय. संरक्षण क्षेत्र हे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याने या क्षेत्राचं खाजगीकरण करणं राष्ट्रच्या हिताचं ठरणार नाही. शेतात अपेक्षित उत्पन्न येत नसेल तर शेतजमीन सावकाराला विकायची नसते. त्यामुळे केंद्र सरकारने ओएफबीच्या सक्षमीकरणावर भर देणं आवश्यक आहे. पण त्याऐवजी केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय.

वास्तविक प्रामाणिकपणे सरकारी कंपन्याचं व्यवस्थापन भक्कम करण्यावर भर दिला तर याच सरकारी कंपन्या सरकारला महसुलाचा मोठा स्त्रोत ठरू शकतात. भारत पेट्रोलियमचं उदाहरण बघितलं तर १२००० कर्मचारी असलेली ही कंपनी २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळपास २६०० कोटी रु नफ्यात होती. १९७६ मध्ये इंदिरा गांधीनी ३ खाजगी कंपन्यांना एकत्र करत राष्ट्रीयीकरणाचा कायदा करून भारत पेट्रोलियम ची उभारणी केली होती. २००३ मध्ये तत्कालीन सरकार भारत पेट्रोलियमचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत असताना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला त्यापासून रोखलं होतं. २०१६ मध्ये बीपीसीएल राष्ट्रीयीकरण कायद्यात केंद्र सरकारने सुधारणा करून भारत पेट्रोलियमच्या निर्गुंतवणूकीकरणाचा मार्ग बहुमताच्या आधारावर मोकळा करून घेतला आणि आज खाजागीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलीय.

नफ्यात असणाऱ्याही कंपन्या विकताना सरकार मागं-पुढं बघत नाही तर ओएफबी सारख्या अडचणीत असलेल्या कंपन्याबाबत सरकारचं धोरण काय आहे हे लक्षात येतं. सरकारी कंपन्या या महसुलाच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत, परंतु हव्यासापोटी या कंपन्यांचं खाजगीकरण करून सोन्याची अंडी देणाऱ्या कंपन्या केंद्र सरकार कापताना दिसतंय. सत्तर वर्षात केंद्र सरकारांनी सरकारी कंपन्या स्थापन केल्या पण सध्याचं सरकार मात्र या कंपन्यांची विक्री काढण्यावर भर देतंय. केंद्र सरकारचं हे दृष्टिहीन धोरण येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याला टांगणीला लावणारं आहे, हे मात्र निश्चित.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत.

यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेसच्या ३५ खासदारांसह हासरथसाठी निघाले होते. मात्र त्यांना तो पर्यंत परवानगी मिळालेली नसल्याने ते हाथरसला पोहोचू शकतील का असा प्रश्न होता. मात्र मला कुणीही हाथरसला जाण्यापासून रोखू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे पोलिस प्रशासन आणि सरकारवर मोठा दबाल आला. त्यानंतर राहुल गांधी यांना ५ लोकांसह हासरथला जाण्याची परवानगी देण्यात आली.

डीएनडीवर पोहोचलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी नियमांचे आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची माहिती नोएडाचे पोलिस सहआयुक्त रणवीर सिंह यांनी दिली होती. तर दुसरीकडे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या घराभोवती मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. या मुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

.. जेव्हा प्रियांका गांधी पोलीस लाठीचार्ज सुरु असतांना बॅरिकेड तोडून कार्यकर्त्यांना वाचवतात; व्हिडिओ व्हायरल

नोएडा । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे रवाना झाले. यावेळी दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र, त्याचवेळी कार्यकर्त्यांना मार खाताना पाहून प्रियांका गांधी त्यांना वाचवण्यासाठी धावून गेल्या. कार्यकर्त्यांना वाचवत असल्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायराल झाला आहे.

हाचं ‘तो’ प्रियांका गांधींचा व्हिडिओ

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी राज्य सरकारने जाहीर केली नियमावली; ‘असे’ आहेत नियम

मुंबई । राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार्स सुरु करण्यासाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचे पालन करुन आस्थापने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे.

काय आहे नियमावली?
१)प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. तापमान, सर्दी, खोकला.
२)लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा.
३)हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी.
४)कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
५)ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.
६)कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
७)प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी.
८)शक्यतो पैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे.
९)वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत राहवे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी.
१०)ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.
११)सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
१२)मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.
१३)एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.
१४)दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे.
१५)वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
१६)हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.
१७)मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

सुशांत प्रकरणी महाराष्ट्राची बदनामी करणार्यांनी आता तोंड न लपवता माफी मागावी – रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये सुशांतने आत्महत्याच केली आहे हे आता सिद्ध झाले आहे.इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे. तसंच पोलिसांनी बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे.

रोहित पवारांनी यासंदर्भात ट्विट करत म्हणले की , “बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी,” .तसंच त्यांनी आपल्या ट्वीटनंतर सत्यमेव जयते असंही लिहिलं आहे.

एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’