Tuesday, June 6, 2023

व्वा! बाजारात आले आपल्या चेहर्‍याच्या डिझाईनचे फॅन्सी मास्क

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आणि आता पुढचे किमान वर्षभर हा विषाणू आपल्यासोबत राहणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस आपल्याला सामाजिक अलगाव च्या सर्व नियमांचे पालन पुढे बरेच दिवस करावे लागणार आहे. आणि मास्क तर गर्दीच्या ठिकाणी सक्तीने घालावाच लागणार आहे. या काळातही विविध कल्पना वापरून ही अनेक नवे ट्रेंड येत आहेत. त्यातलाच एक ट्रेंड साध्य गुजरातमधील बिल्लू शर्मा या फोटोग्राफरनी सुरु केला आहे. त्यांनी नागरिकांना त्यांच्या चेहऱ्याची प्रिंट असणारा मास्क बनवून देण्याचे काम सुरु केले आहे.

गुजरातमधील हे फोटोग्राफर लोकांच्या चेहऱ्यानुसार मास्कवर प्रिंट करून देतात. हा एक नवीन ट्रेंड आला आहे. आपल्या जीवनमानाचा एक भाग होणार असलेल्या या मास्कचा वापरही वेगळ्या पद्धतीने होणार आहे. ते सांगतात, ‘या लोकांच्या मागणीनुसार त्यांच्या चेहऱ्यासारखे मास्क बनवायला केवळ १०-१५ मिनिटे वेळ लागत असून आम्ही त्यासाठी केवळ ५० रु घेतो’ भलेही पुढच्या काळात खूप सावधगिरीने वावरावे लागणार आहे. पण या अशा कल्पक संकल्पनांनी पुढील काळ सुकर नक्कीच होईल.

 

कोरोनाचे हे संकट जगभरात वाढले आहे. हळूहळू या विषाणूंसोबत राहण्याची सवय जगाला करून घेतली पाहिजे. पुढे जाऊन खूप काळ सामाजिक अलगाव ही पाळावा लागणार आहे. पण अशा परिस्थितीतही सकारात्मक राहणे गरजेचे आहे. या विषाणूच्या तडाख्यातून लवकरच सुटका होईल हा आत्मविश्वास ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या अशा संकल्पना नक्कीच हा काळ सुसह्य करतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.