Monday, December 22, 2025
Home Blog Page 5848

मुंबईत देशातील पहिली मोबाईल Covid-19 टेस्टिंग बस! मास स्क्रिनिंगमध्ये होणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ११.५ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रातील या वेगाने वाढणार्‍या कोरोना रुग्णांना पाहता आता मुंबईला पहिली मोबाईल सीओव्हीआयडी -१९ टेस्टिंग बस मिळाली आहे. या बसच्या माध्यमातून मुंबईत अधिकाधिक लोकांची चाचणी होणार आहे. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ब्रम्हंबई नगरपालिका (बीएमसी) चे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या बसचे उद्घाटन केले.

या कोविड -१९ टेस्टिंग बसमध्ये कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. यासह या बसमध्ये एक्स-रे टेस्टची सुविधादेखील उपलब्ध करण्यात आलेली आहे. ज्या बसमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे तेथे एक लहान चेंबर बनविला गेला आहे.

बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर तपासणीची गरज भासू लागली आहे. ही गरज लक्षात घेता पहिली कोविड -१९ टेस्टिंग बस मुंबईला देण्यात आली आहे.हे कोरोनो व्हायरस शोधण्यासाठी ओ २ कॉम्बीनेशन सॅचुरेशन वापरेल आणि Al बेस्ड एक्स-रे देखील वापरेल.

बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले की हि कोविड -१९ टेस्टिंग बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधांसह सुसज्ज आहे. या मदतीने झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागात कोरोनाची चाचणी करणे खूपच सोपे जाईल. यासह, स्क्रीनिंग दरम्यान उच्च धोका असलेल्या संशयितांना क्वारंटाईन ठेवणे देखील सोपे होईल.

कृष्णा डायग्नोस्टिक आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे ही कोविड -१९ टेस्टिंग बस तयार केली आहे. क्लाऊड ट्रान्सफॉर्मच्या मदतीने रेडिओलॉजी विभागाचे तज्ञ आणि डॉक्टर आता कोरोनो विषाणूचे रुग्ण सहज शोधू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मिशन ‘थँक्यू’ : भारतीय सैन्य “असे’ मानणार कोरोना योद्ध्यांचे आभार

नवी दिल्ली । कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावून आघाडीवर कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप आता खुद्द भारतीय लष्कर देणार आहे. कोरोनाविरोधी लढाईतील या योद्ध्यांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त (thank you) केले जाणार आहेत. यात हवाई दलाची विमानं ‘फ्लाय पास्ट’ करणार आहे. समुद्रात नौदलाची लढाऊ जहाजं दिव्यांनी उजळतील आणि देशातील विविध हॉस्पिटल्सवर हेलिकॉप्टर्सद्वारे फुलांचा वर्षावही केला जाणार आहे अशी माहिती भारतीय सैन्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी शुक्रवारी दिली होती.

यानुसार उद्या सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होईल. सर्व प्रमथ लॉकडाऊनमध्ये कर्तव्यावर असताना आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या स्मरणात दिल्लीसह इतर प्रमुख शहरांमधील पोलीस स्मारकांवर आदरांजली वाहण्यात येईल. त्यानंतर हवाई दलाच्या विमानांकडून ‘फ्लाय पास्ट’ करण्यात येईल. यात हवाई दलाची लढाऊ विमानं आणि मालवाहू विमानं सहभागी होतील. ही विमानं उड्डाणांदरम्यान देशाचा बहुतेक भूभाग व्यापतील. सकाळी १० ते ११ वाजेदरम्यान हवाई दलाची विमानं उड्डाणं घेतील. श्रीनगरपासून ते तिरुवनंतपूरम आणि दिब्रुगढ ते कच्छ दरम्यान देशातील सर्व प्रमुख शहरांवरून ही विमानं जातील. हवाई दलाची हेलिकॉप्टर्स आणि नौदलाची हेलिकॉप्टर्स करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर पुष्प वर्षाव करतील. जमिनीपासून ५०० मिटर उंचीवरून ही विमानं आणि हेलिकॉप्टर्स उडतील. यामुळे नागरिकांना ती पाहता येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. करोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांबाहेर लष्कराच्या बॅण्ड करून देशभक्तीच्या गाण्यांची धून वाजवण्यात येईल. डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे लष्कराकडून आभार व्यक्त केला जाईल, असं अधिकारी म्हणाले.

याशिवाय नौदलाची हेलिकॉप्टर्स मुंबई, गोवा, कोची आणि विशाखापट्टणम येथील हॉस्पिटल्सवर पुष्प वर्षाव करतील. सकाळी १० ते १०.३० वाजेदरम्यान हा पुष्प वर्षाव केला जाईल. यानंतर संध्याकाळी ७.३० ते रात्री ११.५९ पर्यंत नौदलाची पाच लढाऊ जहाजं दिव्यांनी लखलखतील. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी ही जहाजं दिव्यांनी उजळून निघतील. गोव्यात नौदलाकडून विमानतळाच्या धावपट्टीवर मानवी साखळी बनवून करोनाविरोधी लढाईतील योद्ध्यांचे आभार मानले जातील. नौदलच्या पूर्व कमांडकडून विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर दोन जहाजं संध्याकाळी ७.३० पासून ते मध्यरात्रीपर्यंत दिव्यांनी उजळून निघतील. यासोबतच तटरक्षक दलाची २४ जहाजं पोरबंदर, ओखा, रत्नागिरी, डहाणू, मुरुड, गोवा, न्यू म्यँगलोर, कावराती, कराइकल, चेन्नई, कृष्णपट्टणम, निझामापट्टणम आणि पोर्ट ब्लेअर अशा दिव्यांनी लखलखतील, अशी माहिती लष्कराचे जनसंपर्क अधिकारी अमन आनंद यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

त्रिपुरा मध्ये BSF च्या २ जवानांना कोरोनाची बाधा; राज्यात फक्त दोन एक्टिव केस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामधील अंबासा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) युनिटमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत ४ प्रकरणे नोंदली गेली आहेत. यातील दोन जण बरे झाले आहेत. आता केवळ दोनच कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे शिल्लक आहेत.

यापूर्वी बिप्लव कुमार देव म्हणाले होते की राज्य सरकार नजीकच्या काळात लॉकडाऊन बंद करण्याचा विचार करीत नाही आहे परंतु टप्प्याटप्प्याने काही निर्बंध शिथिल करण्याच्या पर्यायांवर विचार ते करतील. ते म्हणाले की,३ मे नंतर लगेचच आंतरराज्यीय बस, ट्रेन किंवा विमानसेवा सुरू करणे शक्य नाही.

 

लॉकडाउन हा कोरोना तोडण्याचा एकमेव मार्ग आहे
राज्य सरकारने पुकारलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर देव बुधवारी संध्याकाळी म्हणाले की,’लॉकडाउन बंद करण्याचा दुसरा कुठलाही मार्ग आम्हाला सापडला नाहीये कारण कोरोना विषाणूच्या संसर्गाची कडी मोडण्याचा हा एकमेव मार्ग आहे.असे दिसते आहे की आम्हाला लॉकडाउन सुरूच ठेवावे लागेल मात्र आम्ही काही निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करत आणू.

लोकांना लॉकडाऊन स्वीकारावेच लागेल
देव म्हणाले होते की, “३ मेनंतर आंतरराज्यीय बस, ट्रेन किंवा विमान सेवा पूर्ववत करणे शक्य नाही. लोकांनी लॉकडाउन हे स्वीकारलेच पाहिजे. राज्यातील कोविड -१९ च्या स्थितीविषयी राज्यातील सर्व राजकीय पक्षांना जागरूक केले गेले आहे. ते म्हणाले की, ‘कोणत्याही राजकीय पक्षाने’ त्वरित लॉकडाऊन संपवण्याचा आग्रह धरला नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नांदेडहून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी २९२ जणाना कोरोनाची लागण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने ७००चा आकडा पार केला आहे. यापैकी ३५१ भाविक तर सहा मजूर आहेत.

पंजाबमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन किती आहेत
पंजाबमधील जास्तीत जास्त जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. पंजाबमधील १५ जिल्हे हे ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तीन जिल्हे रेड झोनमध्येतर चार जिल्हे हे ग्रीन झोनमध्ये आहेत. जालंधर, पटियाला आणि लुधियाना हे रेड झोनमध्ये आहेत.त्याचबरोबर जर आपण ऑरेंज झोनबद्दल चर्चा केली तर सास नगर, पठाणकोट, मानसा, तरण तरण, अमृतसर, कपूरथला, होशियारपूर, फरीदकोट, संगरूर, शहीद भगतसिंग नगर, फिरोजपूर, मुक्तसर साहिब, मोगा, गुरदासपूर आणि बरनाला अशी नावे समाविष्ट आहेत. ग्रीन झोन म्हणजे रूपनगर, फतेहगड साहिब, बठिंडा आणि फाजिल्का यांचा समावेश आहे.

नकारात्मक वेळेतून जात आहेत: सीएमकोविड -१९च्या सुरक्षेसाठी सरकारने घेतलेल्या उपायांवर विरोधकांकडून सतत टीका केली जाते आहे.विरोधकांच्या टीकेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, या कठीण काळात कुणालाही नकारात्मक ऐकायचं नाही आहे.लोक अशा नकारात्मक काळातून जात आहेत आणि आता त्यांना फक्त सकारात्मक आणि चांगलेच ऐकायचे आहे.” सिंग यांनी विरोधकांना पंजाबच्या हितासाठी आपल्या सरकारशी खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की आपण एक युद्ध लढवित आहोत आणि गलिच्छ राजकारण करण्याची हि वेळ नाहीये तर एकतेची भावना दाखविण्याची ही वेळ आहे.

इस्राएलकडून केली मदतीची मागणी
अधिकृत प्रवक्त्याने प्राप्त केलेल्या माहितीनुसार, पंजाब सरकारने राज्यातील कोरोना विषाणूच्या साथीच्या प्रादुर्भावाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी इस्त्राईलकडून तांत्रिक मदत मागितली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्र सरकार मोठं पॅकेज जाहीर करणार? मोदी, शाह आणि सीतारामन यांच्यात बैठक

नवी दिल्ली । कोरोनामुळे प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच दुसरं प्रोत्साहनपर पॅकेज अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची याबाबत बैठकही झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमन यांच्याशी चर्चा केली असून अर्थखात्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या खात्यांशीही चर्चा करणार आहे. लघु तसंच लघु आणि मध्यम उद्योगातील काही मोठ्या अधिकाऱ्यांसोबत नरेंद्र मोदी बैठक घेणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. अर्थ मंत्रालय देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने पंतप्रधानांसमोर एक सविस्तर सादरीकरण करणार असून आपल्या वेगवेगळ्या योजनांचीही माहिती देणार आहे.

पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच नागरी उड्डाण, कामगार आणि ऊर्जा मंत्रालयासह विविध मंत्रालयांसोबत बैठक घेतली आहे. अर्थव्यवस्था लवकरात लवकर रुळावर आणण्यासाठी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांसह परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयासोबतही बैठक झाली आहे. या बैठकांमध्ये गृह मंत्री आणि अर्थमंत्र्यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या घटकांसाठी सरकारने यापूर्वी १.७० लाख कोटींची मदत जाहीर केली होती. यामध्ये मोफत अन्न वितरण, घरगुती गॅस वितरण, महिलांना अर्थसहाय्य यासह विविध उपाययोजनांचा समावेश होता. सूत्रांच्या मते, सरकार आता मध्यमवर्गीय आणि उद्योग जगतासाठी प्रोत्साहन पॅकेजवर विचार करत असल्याची माहिती आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिल्लीहून पुण्या मुंबईला विशेष रेल्वे पाठवा; राजधानीत अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला सुप्रिया सुळे

मुंबई । व्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉकडाउन आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित कामगार,पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मराठी विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जातात. आता लॉकडाउनमूळे दिल्लीत अडकलेल्या अशा विद्यार्थ्यांकरिता विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिल्ली येथे अडकले आहेत. कृपया नवी दिल्लीहून मुंबई व पुण्याला एक विशेष रेल्वे गाडी पाठवावी. जेणेकरुन हे विद्यार्थी महाराष्ट्रात परत आपल्या घरी परतू शकतील अशी विनंती खासदार सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सदर प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करत सुळे यांनी दिल्लीतील स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांना धीर दिला आहे. पुण्यातहि राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनाही आपआपल्या गावी जात यावे याकरता शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

हुर्रे!ग्रीन,ऑरेंज झोनमधील नागरिकांच्या केसाला लागेल कात्री; सलून दुकानांना केंद्राची परवानगी

नवी दिल्ली । कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये ठप्प पडलेल्या उद्योग धंद्यांना पुन्हा सुरु करण्याची परवानगी आता केंद्रानं टप्पाटप्प्यानं द्यायला सुरुवात केली आहे. दारू विक्रीची दुकान आणि पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी दिल्यांनतर आता सलूनची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. येत्या ४ मे पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलूनची दुकान सुरु होतील. या निर्णयानंतर आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या कालावधीत वाढलेले केस आणि दाढीला वैतागलेल्या लोकांना दिलासा मिळाणार आहे. याव्यतिरीक्त इ-कॉमर्स कंपन्यांनाही या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वस्तूंची विक्री करण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, सलूनची दुकान केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सिंघम गाण्यावर पोलिस अधिकार्‍याचा Ak47 हातात घेऊन TikTok व्हिडिओ !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन सुरु आहे.अशा काळात, यूपी पोलिस हे Corona Warrior म्हणून नावारूपाला आले आहे.वाराणसी जिल्ह्यात संसर्ग असूनही पोलिस त्यांच्या ड्यूटीचे काम चोख बजावत आहेत.मात्र संक्रमणाच्या या काळात त्याच बनारसच्या पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या एका पोलिसाचा हातात एके-४७ घेतलेला एक टिकटॉकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा तपास झाला
या व्हिडिओमध्ये,एक पोलीस इन्स्पेक्टर एके-४७ सह अजय देवगणच्या सिंघम चित्रपटाच्या गाण्यावर चालताना दिसत आहे. या इन्स्पेक्टरचा हा व्हिडिओ शहरात चर्चेचा विषय बनून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.जेव्हा टिकटॉकचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर या इन्स्पेक्टरच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

हे प्रकरण वाराणसीच्या चौबेपूर पोलिस स्टेशनचे आहे जिथे हर्ष भदोरिया याने सेकंड ऑफीसर म्हणून पोस्ट स्वीकारली.हा व्हीडिओ त्याने केव्हा व का बनविला एसएसपीने या सर्व बाबींचा तपास एएसपीकडे सोपविला आहे.मात्र त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतो आहे.विभागीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्ष भदोरिया हा अधिकारी पश्चिम यूपीचा एक अतिशय लोकप्रिय इन्स्पेक्टर आहे. तेथून त्याची प्रशासकीय कारणास्तव वाराणसीत बदली झाली आहे.

एके 47 के साथ दरोगा।

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना झाल्याच्या शंकेतून ६० वर्षीय वृद्धाची चौथ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हैदराबादमध्ये येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने शनिवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.पोलिस आणि कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत व्यक्ती हा काही काळापासून आजारी होता आणि त्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता.तो इतका मानसिक अस्वस्थ झाला होता की त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली.ज्यामुळे त्याने आपले प्राण गमावले.वसीराजू कृष्णमूर्ती असे मृताचे नाव आहे.

वसीराजू कृष्णमूर्ती हैदराबादच्या अप्पल पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या रमंतपुरा येथे राहत होते. उप्पल पोलिसांनी सांगितले आहे की, तो बराच काळ दम्याने पीडित होता आणि त्याची तब्येतही ठीक नव्हती.गेल्या काही दिवसांपासून तो कोविड -१९ ने संक्रमित असल्याचा विचार करत नैराश्यात गेला होता.
काही दिवसांपूर्वीच कृष्णमूर्ती यांनी श्वास घेण्यात अडचण होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला राजा कोठी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह होती. शनिवारी सकाळी मूर्ती यांनी पुन्हा पोटदुखीची तक्रार केली. जे त्याला वाटले कि कोविड -१९ चे लक्षण आहे.

त्याने कुटुंबीयांकडे वेदना होत असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी त्याला गांधी रुग्णालयात तपासणीस चलण्यास सांगितले,कारण तेथे कोरोनाच्या चाचणीची खास सुविधा आहे. जेव्हा ते त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या तयारीत होते तेव्हा तो चौथ्या मजल्यावर पोहोचला आणि बाल्कनीतून उडी मारली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टम तपासणीसाठी पाठविला आहे.

कोरोना रूग्ण आणि त्याच्या संशयितांमध्ये सतत नैराश्याची भावना दिसून येते आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे.जिथे सोमवारी कोरोना बाधित एका रूग्णाने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. बेंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील ट्रॉमा वॉर्डमध्ये एका ५० वर्षीय रूग्णाला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, रुग्ण त्याच्या बेडवरून उठला आणि खिडकीतून उडी मारली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्रावरील ‘त्या’ अन्यायकारक निर्णयाची केंद्राला मोठी किंमत चुकवावी लागेल- खासदार शेवाळे

मुंबई । केंद्र सरकारने मुंबईच्या आकसापोटी आणि गुजरातवरील प्रेमापोटी मूळ निर्णयात फेरफार करून ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ (IFSC) गांधींनगर गुजरात येथे हलविण्याचा घेतलेला निर्णय आक्षेपार्ह आहे. दरवर्षी मुंबईतून केंद्राला सुमारे पावणे २ लाख कोटींचा कर दिला जातो. तसेच देशभरातील 90 टक्के व्यापारी बँकिंग, ८० टक्के म्युच्युअल फंडची नोंदणी मुंबईतुन होते. या सर्व बाबींचा विचार करता, आयएफएससी मुंबईबाहेर नेल्यास, केंद्र सरकारला या अन्यायकारक निर्णयाची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा असा थेट इशारा शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांसह अनेक महत्वाच्या आर्थिक संस्था मुंबईत आहेत. त्यामुळे जगभरातील आर्थिक घडामोडींशी ताळमेळ साधणारे, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र’ मुंबईतच असावे, असा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागाही निश्चित करण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने ही जागा मेट्रो रेल्वेसाठी आरक्षित करून आयएफएससी मुंबईत उभारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप याआधीही, खासदार शेवाळे यांनी लोकसभेत केला होता. तसेच आयएफएससी मुंबईबाहेर गेल्यास, मुंबईतून केंद्राला जाणारा कर रोखला जाईल. त्यामुळं दरवर्षी एकट्या मुंबईकडून केंद्राकडे जमा होणारा सुमारे ४० टक्के कर, गांधीनगर इथूनच वसूल करावा, असा सल्लाही खासदार शेवाळे यांनी केंद्राला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”