Monday, December 22, 2025
Home Blog Page 5849

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

महाराष्ट्रातून लखनौला जात होते
देशाच्या विविध भागात अडकलेल्या मजुरांना, विद्यार्थ्यांना आणि इतरांना अन्य राज्यांतून त्यांच्या घरी नेण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी काही खास गाड्यांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, एका व्हिडिओमध्ये काही लोकं ही कॉंक्रिट मिक्सरच्या ट्रकच्या टाकीमधून बाहेर पडताना दिसले तेव्हा सोशल मीडियावर अनेक जण आश्चर्यचकित झाले. मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूरचा आहे.इथे एका छोट्या मार्गाने लोक ट्रकमधून कसे बाहेर पडत आहेत हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते.

काँक्रीट मिक्सर ट्रकच्या मिक्सर टँकमध्ये १८ लोक लपलेले होते
असे सांगितले जात आहे की महाराष्ट्रातून काही मजूर पोलिसांपासून लपून त्यांच्या घरी जात होते पण त्यांना वाटेतच पकडण्यात आले. डीएसपी उमाकांत चौधरी यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील इंदूर येथे पोलिसांना महाराष्ट्रातून लखनौला जाणाऱ्या एका कॉंक्रिट मिक्सर ट्रकच्या मिक्सर टँकमध्ये १८ जण प्रवास करत असलेले आढळले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांचे सुभेदार अमित कुमार यादव यांनी सांगितले की, नियमित तपासणी दरम्यान इंदूर शहरापासून सुमारे ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या पंथ पिपलाई या गावात हा ट्रक थांबविण्यात आला.

तेथे १४ कामगार आणि ४ ट्रक मालकाचे कर्मचारी होते
ते पुढे म्हणाले की, जेव्हा शंका आली तेव्हा आम्हीया कॉंक्रिट मिक्सर ट्रकची तपासणी केली आणि उघड्या झाकणातून आत डोकावले तेव्हा आतमध्ये १८ लोकांना पाहून आमचे डोळे विस्फारले गेले.या ट्रकमध्ये १४ प्रवासी मजूर आणि ४ ट्रक मालकाचे कर्मचारी लपून युपीकडे जात होते. अमितकुमार यांच्या मते, हे कामगार उत्तर प्रदेशचे असून लॉकडाउनमुळे ते महाराष्ट्रातून घरी परतत होते.

 

घरी पाठविण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात येते आहे
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील कारखाने बंद झाल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असे कामगारांनी सांगितले. त्यामुळे त्यांना काहीही करून लखनौ गाठायचे होते. वाहतूक पोलिस सुभेदार पुढे म्हणाले की,त्यांच्या चौकशीदरम्यान हे सर्वजण शुक्रवारीच महाराष्ट्र सोडून आले असल्याचे आढळले. सध्या या सर्वांना शेल्टर होममध्ये ठेवण्यात आले असून डॉक्टरांना बोलावून त्यांची प्रकृती तपासली जात आहे. मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचीही व्यवस्था केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर दरेकर संतापले; म्हणाले आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील

मुंबई । भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवर दरेकर चांगलेच संतापले असून त्यांनी या सर्वांना दम दिला आहे. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून देवेंद्र फडणवीस, भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिली जात आहे असून अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज काही जण पसरवत आहेत. अशांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळांने आज मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना दरेकर म्हणाले की, “राज्यपालांच्या टोपीवर वक्तव्य केल्यानंतरही जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे गंभीर असून पोलीस दुजाभाव करत असल्याचा आमचा आरोप आहे. आक्षेपार्ह पोस्ट नसतानाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जात असून हे सरकार सुडाचं राजकारण करतंय का अशी शंका निर्माण होत आहे. काही ठिकाणी अश्लील पोस्ट टाकल्यानंतर त्याला दम देणं अपेक्षित आहे का ? भाजपाची सहनशीलता दुर्बलता समजू नये. अन्यथा आमचे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देतील,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, “मुंबई पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं आहे. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. तात्काळ एफआयआर केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे”. प्रवीण दरेकर यांनी यावेळी पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांसंबंधी चिंता व्यक्त केली. “पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे ते सुरक्षित नसल्याचं समोर येत आहे. रोज हल्ले होत असल्याने पोलिसांचं मनोबल खचत आहे. पोलिसांचं खच्चीकरण झालं तर करोनाशी लढणं मुश्कील होईल. त्यांच्या सुरक्षेसाठी टोकाची कठोर कारावई करणं गरजेचं आहे,” असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनामुळे लग्न लावायला पंडित मिळेना; महिला पोलिस अधिकार्‍यांनेच लावून दिलं लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे.अशा परिस्थितीत अनेक लग्नें पुढे ढकलण्यात आली आहेत. आणि ज्या लोकांना लग्न करायचे आहे अशांना प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत आहे. मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यात लॉकडाउन मुले जिथे पंडित मिळाला नाही तिथे पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अंजली अग्निहोत्रीने पंडितची भूमिका साकारून वधू-वरांसह लग्नाचे विधी पूर्ण केले.ही घटना गोटेगाव तहसीलमधील झोदेश्वर शहरातील. श्रीनगर येथे राहणारे लक्ष्मण चौधरी यांचे लग्न नरसिंगपूरच्या इतवारा येथील ऋतू हिच्याशी ठरले होते. प्रशासनाने या दोन्ही कुटुंबांना हे लग्न करण्याची परवानगी दिली होती, पण त्यांना पंडित मिळत नव्हता. मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हा विवाहसोहळा पार पडणार होता.

लग्नाच्या विधी पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणताही पंडित मिळाला नाही. त्यानंतर लोकांनी उपनिरीक्षक अंजलीला पंडितची भूमिका साकारण्याची विनंती केली कारण अंजली या ब्राह्मण कुटुंबातील आहेत.त्याही अगदी आनंदाने तयार झाल्या आणि वैवाहिक विधी पार पाडला.अंजली या पोलिसी ड्रेसमध्येच होत्या आणि तेथील सर्व लोकांनी मास्क देखील घातलेला होता.

या लग्नाबाबत अंजली म्हणतात की त्या गस्तीवर होत्या, त्यादरम्यान त्यांना मंदिरात काही लोक जमलेले दिसले.त्यांना प्रशासनाची परवानगी मिळाली आहे परंतु पंडित न मिळाल्याने निर्माण झालेल्या समस्येची माहिती त्यांना दिली आणि लग्नात सहकार्य करण्याची विनंती केली आणि मी ते मान्य केले कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच सर्वांना सहकार्य करण्याचे निर्देश दिलेले आहेत. काही मंत्रांच्या आधारे त्यांनी त्या जोडप्यांवर वैवाहिक संस्कार केले.ज्याविषयी माहिती नव्हती ती गुगलवरून घेतली आणि हवन कुंड नसल्याने त्यांनी दिवा वापरला.

विशेष म्हणजे कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपुष्टात येईल. लॉकडाऊन आता ३ मे ते १७ मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणालाही लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याची परवानगी नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘मातोश्री’च्या दारावर कोरोनाची पुन्हा धडक! तैनात असलेले ३ पोलीस कोरोनाग्रस्त

मुंबई । मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानावर पुन्हा एकदा कोरोनाने धडक दिली आहे. मातोश्रीबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या ३ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पोलीस कर्मचारी मागील काही दिवसांपासून इथे कार्यरत आहेत. याआधी मातोश्री परिसरातल्या चहावाल्याला करोनाची लागण झाली होती.

दरम्यान करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या ३ पोलिसांवर उपचार करण्यात येत आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या या पोलिसांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून येत नव्हती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कला नगर भागातील सगळ्या पोलिसांनी पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येते आहे. याआधी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये सगळ्या पोलिसांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.

याआधी २२ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या बंगल्यावर तैनात असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी या सहाय्यक निरीक्षकाच्या संपर्कात असलेल्या ६ जणांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तर वर्षा बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर आता मातोश्रीबाहेर तैनात असलेल्या ३ पोलिसांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान मुंबईत शुक्रवारी करोनाग्रस्तांची संख्या ७ हजार ६०० च्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत २९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्यात येते आहे. सोशल डिस्टन्सिंग, करोना प्रतिबंधित क्षेत्र, करोनाशी संबंधित चाचण्या वाढवणं हे सगळं केलं जातं आहे. तरीही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर सरकार आणि मुंबई महापालिका सर्वतोपरी उपाय योजण्याचे प्रयत्न करते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत ४ मे पासून सलून होणार सुरू; पहा तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे केंद्र सरकारने लॉकडाउनचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. त्याअंतर्गत ३ मे रोजी संपणार असलेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. यासह, गृह मंत्रालयाने देशातील ७३३ जिल्ह्यांच्या आधारे रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभाजन केले आहे.अजूनपर्यंत यापैकी कोणत्याही झोनमध्ये सलून आणि नाव्ह्याची दुकाने पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती,पण आता गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले की ४ मेपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील सलून, नाव्ह्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली जाईल.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने असे सांगितले की, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांकडून अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली जाणार नाही. गृह मंत्रालयाने रेड झोनमध्ये १३० जिल्हे, ऑरेंज झोनमध्ये २४४ तर ग्रीन झोनमध्ये ३१४ जिल्हे समाविष्ट केली आहेत.ग्रीन झोनच्या जिल्ह्यांमध्ये नाव्ह्याची दुकाने, सलून आणि इतर अत्यावश्यक सेवा आणि वस्तू देणारी दुकाने ४ मेपासून उघडतील.

No Salon Shops amid Lockdown Says MHA Joint Secretary

ग्रीन झोनमध्ये सवलती उपलब्ध असतील
त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर लागू असलेल्या ग्रीन झोन भागात इतर कोणतेही बंधन लागू असणार नाही. तसेच सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यक्रमांना येथे पूर्णपणे सूट दिली जाईल. येथे ५० टक्के सीट्स भरून बसेस सुरु करण्यास परवानगी आहे. ते एका ग्रीन झोनपासून दुसर्‍या ग्रीन झोनमध्ये जाण्यास सक्षम असतील हे निर्बंध बाकीच्या तीन झोनमध्ये मात्र कायम राहतील.

सर्व झोनमधील ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले लोकं, आजारी असलेली लोकं आणि गर्भवती महिलां व्यतिरिक्त, कोणत्याही महत्वाच्या कामासाठी किंवा आरोग्याच्या कारणास्तव १० वर्षांखालील मुले बाहेर पडण्यास सक्षम असतील, सर्व झोनमधील लोक सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत अनावश्यक फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तिन्ही झोनमध्ये वैद्यकीय आणि ओपीडी सुविधा खुल्या असतील. परंतु सोशल डिस्टंसिंगच्या मार्गदर्शनाचे पालन करणे आणि तोंडावर मास्क घालणे आवश्यक असेल.

MHA च्या निर्देशानुसार खालील जिल्ह्यात सलून सुरु होणार आहेत –

ऑरेंज झोन –
381 – रायगड – ऑरेंज झोन
382 – अहमदनगर – ऑरेंज झोन
383 – अमरावती – ऑरेंज झोन
384 – बुलढाणा – ऑरेंज झोन
385 – नंदुरबार – ऑरेंज झोन
386 – कोल्हापूर – ऑरेंज झोन
387 – हिंगोली – ऑरेंज झोन
388 – रत्नागिरी – ऑरेंज झोन
389 – जालना – ऑरेंज झोन
390 – नांदेड – ऑरेंज झोन
391 – चंद्रपूर – ऑरेंज झोन
392 – परभणी – ऑरेंज झोन
393 – सांगली – ऑरेंज झोन
394 – लातूर – ऑरेंज झोन
395 – भंडारा – ऑरेंज झोन
396 – बीड – ऑरेंज झोन

ग्रीन झोन –
397 – उस्मानाबाद – ग्रीन झोन
398 – वाशिम – ग्रीन झोन
399 – सिंधुदुर्ग – ग्रीन झोन
400 – गांडिया – ग्रीन झोन
401 – गडचिरोली – ग्रीन झोन
402 – वर्धा – ग्रीन झोन

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

महाराष्ट्रातून युपीला सायकलवर चालला होता; वाटेत चक्कर येऊन पडल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातून एक व्यक्ती सायकलवरून घराकडे जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बरवानी येथे या माणसाचा मृत्यू झाला.हा व्यक्ती भिवंडी, महाराष्ट्र येथून उत्तर प्रदेशला रवाना झाला होता.बरवानीचे एसडीएम जी धनगड यांनी सांगितले की, ‘तो बेशुद्ध अवस्थेत सापडला होता त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.

२५ मार्चपासून सुरू झालेले लॉकडाउन आता १७ मे पर्यंत सुरु राहणार आहे,त्यादरम्यान बरेच लोक मरण पावले आहेत जे त्यांच्या घरी परत जात होते. यातील अनेक लोक रस्त्यात अपघातात ठार झाले तर काहींचा वाटेत असतानाच मृत्यू झाला. अलीकडेच, उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती येथील रहिवाशाचा आपल्या गावी पोहोचल्याच्या ४ तासानंतर मृत्यू झाला.

Indian Railways converts old train cars into coronavirus ...

स्थलांतरितांसाठी गाड्या सुरु
लॉकडाऊन सध्या तिसऱ्या टप्प्यात असून सरकारने स्थलांतरितांना त्यांच्या घरी नेण्यासाठी विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. तत्पूर्वी, लॉकडाऊनचा पहिला टप्पा २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान होता जो पुढे वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला.एक मे रोजी, गृह मंत्रालयाने आपत्ती अधिनियम २००५ अंतर्गत ४ मे ते १५ मे या कालावधीत लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा सुरु करण्याबद्दल माहिती दिली. शनिवारी देशात कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढून १,२१८ झाली आणि संसर्गाच्या घटनांची संख्या ३७,३३६ वर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या साथीच्या आजाराने संक्रमित २६,१६७ रुग्णांवर देशात उपचार केले जात असून ९,९५० लोक पूर्णपणे स्वस्थ झाले आहेत.एक रुग्ण हा देशाबाहेर गेला आहे. या प्रकरणांमध्ये एकूण १११ विदेशी नागरिकांचा सहभाग आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मोदींच्या बचावासाठी फडणवीस मैदानात; IFSC केंद्र गुजरातला हलवण्याला काँग्रेस जबाबदार

मुंबई । मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) गुजरातला हलवण्यासंबंधी मोदी सरकारनं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची चर्चा होत असताना राज्यातील भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मोदी सरकारच्या बचावासाठी आता मैदानात उतरले आहेत.  आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलविण्याबाबत महाराष्ट्रात सर्व स्तरातून मोदी सरकारवर संताप व्यक्त होत असताना फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हद्वारे काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रासंबंधी (IFSC) भ्रम पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी छाती बडवण्याचा हा प्रकार आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कायम टीका करण्यासाठी काही लोकांना केवळ सोयीच्या गोष्टींचे स्मरण होते अशी उलट टीका देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सरकारवर केली आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी तसंच एकही दमडीचं काम केलं नाही हे लपवण्यासाठी मोदी सरकारवर आरोप केले जात असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने फेब्रुवारी २००७ मध्ये अहवाल सादर केला होता. २००७ ते २०१४ दरम्यान तत्कालीन केंद्र किवा राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यासंबंधीच पत्र किंवा साधा अर्जही पाठवण्यात आला नाही. दरम्यान,  त्याच काळात २००७ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्या संधीचा फायदा घेतला. असं म्हणत फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला हलवण्यामागे महाराष्ट्रावर अन्याय होत असल्याचा विरोधकांचा आरोप निराधार असल्याचा इशारा करत मोदी सरकारवर होणारी टीका चुकीची असल्याचं बिंबवण्याचा प्रयन्त केला.

गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी २०१२ पर्यंत कार्यवाही पूर्ण केली आणि काम सुरु केलं,  असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. डिसेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केले आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. “आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते २००७ ते २०१४ या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारवर मुंबईचे महत्व कमी करण्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवर केली आहे.

दरम्यानच्या, काळात गिफ्टसिटीमध्ये कामकाजाला प्रारंभ झालेला असल्याने तत्कालीन वित्तमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले होते की, दोन आयएफएससी एकत्रित काम करू शकतात का, ही बाब आमच्या विचाराधीन आहे. असे होऊ शकते, याबाबत महाराष्ट्र सरकारने अहवाल सादर केला आणि ही बाब अद्यापही विचाराधीन आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगत या वादावर सारावासराव करण्याचा प्रयन्त केला. आयएफएससीसाठी मुंबईचा दावा हा अतिशय नैसर्गिक आहे आणि महाराष्ट्र सरकारने ठरविले, तर निश्चितपणे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. “कोणताही प्रयत्न न करता दुसऱ्याच्या माथी खापर फोडू नका,” अशी विनंती यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘या’ भारतीय फलंदाजाला बाद करणे होते सर्वांत कठीण; ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेटलीचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे दिग्गज फलंदाज असलेले सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एका दशकापेक्षा जास्त काळ जगातील अनेक गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या सर्व फलंदाजांनी मिळून जगातील सर्वात मजबूत गोलंदाजीविरूद्ध खोऱ्याने धावा केल्या.यापैकीच एक भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आहे ज्याने जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा सामना केला.

अलीकडेच आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांपैकी एक मानल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने लक्ष्मणचा त्याचा आवडता फलंदाज म्हणून उल्लेख केला आहे.क्रिकेटच्या मैदानावर लक्ष्मण आणि ब्रेट ली यांच्यात चुरशीची झुंज पाहायला मिळाली आणि बहुतेक वेळा लक्ष्मणच सरस ठरायचा. म्हणूनच अजूनही ब्रेट लीचा भारताच्या या दिग्गज खेळाडूबद्दल मनापासून आदर बाळगून आहे. केवळ ब्रेट लीच नाही तर त्या काळातील सर्वच ऑस्ट्रेलियन खेळाडू लक्ष्मणचा आदर करत.

स्टार स्पोर्ट्स शोमध्ये लक्ष्मणच्या फलंदाजीची आठवण ब्रेट लीने केली तो म्हणाला,“गोलंदाजांना त्याचे तंत्र समजणे फार कठीण होते, त्यांची खेळाची शैली खूप चांगली होती.त्याचे फुटवर्क अद्भुत होते. ”

Brett Lee, VVS Laxman - Brett Lee and VVS Laxman Photos - Third ...

म्हणूनच ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचा रेकॉर्ड शानदार आहे. लक्ष्मणने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण २९ कसोटी सामने खेळले असून त्यात ४९.६१ च्या सरासरीने २४३४ धावा केल्या. या दरम्यान त्याने २००१ मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळलेल्या २८१ धावांच्या अविस्मरणीय व्दिशतकांसह एकूण ६ शतके केली.

केवळ कसोटीतच नाही तर लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाच्या वनडेमध्येही धमाकेदार खेळी केल्या. लक्ष्मणच्या या शानदार फलंदाजीचा अंदाज यावरूनच येतो कि एकदिवसीय मालिकेत त्याने एकूण ६ शतके ठोकलेली आहेत, त्यापैकी ४ शतके ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६.१८ च्या सरासरीने ७३३ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३१० आणि एकदिवसीय सामन्यात ३८० गडी बाद केले आहेत,तो म्हणाला,”लक्ष्मण हा एक हुशार फलंदाज होता ज्यामुळे गोलंदाजांना त्याला बाद करणे कठीण होत होते.”

ब्रेट ली म्हणाला, “लक्ष्मण एक असा फलंदाज होता जो धीर धरत क्रीजवर उभा रहायचा आणि संधीची वाट पहायचा.तो खूप हुशार होता आणि जेव्हा त्याच्या लयीमध्ये यायचा, तेव्हा त्याच्यासमोर कोण गोलंदाजी करीत आहे याने त्याला काही फरक पडत नव्हता.गोलंदाजांचे मन वाचण्यात लक्ष्मण खूप पारंगत होता.

VVS Laxman's incredible 281 in 2001 is the best I've seen against ...

ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळलेल्या २८१ धावांच्या खेरीज लक्ष्मणने २००३ च्या अ‍ॅडलेड कसोटी सामन्यातही १४३ धावांची अविस्मरणीय खेळी केली. या सामन्यात भारतीय संघाने एका वेळी केवळ ८५ धावांच्या मोबदल्यात ४ गडी गमावले होते तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात भारतासमोर ५५६ धावांचा विशाल डोंगर उभा केला.

याच सामन्यात लक्ष्मणशिवाय राहुल द्रविडने भारतासाठी २३३ धावा केल्या होत्या, त्यामुळे भारतीय संघ ही कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला आणि हा सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी साधली.

Legends Month: The best of VVS Laxman | cricket.com.au

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊन लग्न! चक्क बाप म्हणून पोलिसांनीच केलं कन्यादान

पुणे । सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळं राज्यासह देशात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याच्या एकदिवसआधीच लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली. या वाढत्या लॉकडाउनच्या कालावधीचा सर्वात जास्त भावनिक फटका कोणाला बसत असेल तर तो म्हणजे लग्न जमलेल्या जोडप्यांना. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व काही बंद त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी त्यामुळं लग्न जमलेल्या जोडप्यांचा एकत्र येण्याआधीच विरह सहन करावा लागत आहे. दरम्यान, यावर मात करत काही जोडप्यांनी आपलं लग्न उरकल्याच्या भन्नाट घटना लॉकडाऊनमध्ये समोर येत आहेत. पुण्यात सुद्धा असंच एक लॉकडाऊन लग्न पार पडलं. कमालीची बाब म्हणजे खुद्द पुणे पोलिसांनी वधू पित्याचं कर्तव्य पार पाडत कन्यादान करून हे लग्न पार पाडलं.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. या दरम्यान आयटी इंजिनिअर असलेल्या आदित्य बिश्त आणि डॉक्टर असलेल्या नेहा कुशवाह यांचा विवाह पुण्यातील अमोनोरा क्लबमध्ये पार पडला. असून त्यांच पोस्टिंग डेहराडूनला आहे तर मुलीचे वडील देखील सैन्यात डॉक्टर असून नागपूरमध्ये कार्यरत आहेत.दोन्ही बाजूच्या पालकांना लॉकडाऊनमुळे लग्नाला हजर राहणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांनाच कन्यादान करण्याची विनंती केली. सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी देखील लॉकडाऊनमधलं हे आगळं वेगळं लग्न पार पाडलं. हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी या लग्नाला हजर होते. पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी मनोज पाटील यांनी मुलीचं कन्यादान केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

उदयनराजे भोसले यांनी ठोकला पत्रकारांना सलाम, म्हणाले…

udayanraje bhosale
udayanraje bhosale

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्यात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे अशातही आपला जीव धोक्यात घालून स्वतःची जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच यामध्ये पत्रकारही कुठे मागे नसून ते सर्व अपडेट आपल्याला घर बसल्या पोहोचवत आहेत. यापार्श्वभूवर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक करत त्यांना सलाम ठोकला आहे.

संपूर्ण देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आपल्या तसेच रुग्णांच्या सेवेस तत्पर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी तसेच पोलीस जवानांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण झाले आहे ही खूप चिंतेची बाब आहे. त्याचप्रमाणे लोकशाही चा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील आपले पत्रकार मित्र सुद्धा कोरोना संक्रमणापासून वाचू शकले नाहीत, दिवस रात्र जनतेसाठी आपल्या वाचकांसाठी उन्ह, वारा, पाऊस तसेच नैसर्गिक आपत्ती असेल पत्रकार कधी मागे हटला नाही असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांचे कौतुक केले आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेयर करून भोसले यांनी पत्रकार मित्रांचे कौतुक केले आहे. यावेळी भोसले यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक क्षणाची खबर आपल्यापर्यंत पोहचवणे याला पत्रकार आद्यकर्तव्य मानून जनतेला घरी राहून कोरोनावर मात करण्याचे आवाहनही करत आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी खूप कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. सलाम आहे तुमच्या कार्यकर्तृत्वाला व तुमच्या धैर्याला. परंतु आपल्या व आपल्या कुटुंबाप्रती आमचे आपणास आवाहन राहील जसे तुम्ही फिल्ड काम करताना महाराष्ट्राला काळजी घेण्याचे आवाहन करता तसेच तुम्हीही स्वतःची काळजी घेऊन आपले कर्तव्य पार पाडा असे आवाहनही भोसले यांनी यावेळी केले आहे.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/videos/3253943774637057/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”