हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला आहे. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
परमबीर सिंह प्रकरणात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे सिंह यांना कारवाईपासून संरक्षणही मिळाले होते. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणीही सर्वोच्च न्यायलयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. कारण, या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार आहे.