फडणवीसांच्या काळात जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंगांनी कबुली द्यावी; तरच ते प्रामाणिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना शनुवारी घडली. प्रथमच एका पोलिस अधिकार्‍यांने खुद्द गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये जमा करायचे टर्गेट दिल्याचा खुलासा केल्याने खळबळ उडाली. यावरुन आता सत्ताधारी अन् विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीसांच्या काळात जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंगांनी कबुली द्यावी असं मत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले आहे.

मागच्या काळात माजी गृहमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून जी वसुली केली जायची याबाबत परमवीरसिंग यांनी प्रामाणिकपणे कबुली द्यावी. तरच ते प्रामाणिक आहेत हे सिद्ध होईल असं म्हटलं आहे. अन्यथा अचानक झालेला साक्षात्कार दिल्लीश्वराच्या आदेशावरून आहे यात कुणाला शंका नसेल असं म्हणत मिटकरी यांनी परमबीर सिंग यांच्या भुमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त परमबीर सिंग अचानक गृहमंत्र्यांवर जे खोटे आरोप करायला लागलेत यावरून भाजपाने केंद्रीय यंत्रणेचा यावेळीही गैरवापर करून दडपशाही मार्गाने सिंगाना पत्रव्यवहार करायला भाग पाडलय. भाजपा सत्तेसाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकते हे महाराष्ट्राला माहित आहे. सावधान. असं म्हणत मिटकरी यांनी गंभीर आरोप केले आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

इतर महत्वाच्या बातम्या –

Leave a Comment