औरंगाबाद | महाराष्ट्र राज्यातून राजस्थान मधील कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक असल्याचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, उत्तर पश्चिम रेल्वेने एका पत्राद्वारे सांगितले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
राजस्थानमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनुसार राजस्थान राज्यात जाताना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक केले आहे.
कोणत्याही रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक असल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.