नवी दिल्ली । एसबीआय कार्डने (SBI Card) डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमच्या (Paytm) सहकार्याने दोन क्रेडिट कार्ड (Credit Card) लॉन्च केलेले आहेत. पेटीएमने ‘पेटीएम एसबीआय कार्ड’ (Paytm SBI Card) आणि ‘पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट’ (Paytm SBI Card SELECT) असे दोन प्रकारचे कार्ड लॉन्च केलेले आहेत. यामध्ये युझर्सना 1% ते 5% पर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकवर कोणतेही कॅपिंग होणार नाही.
Paytm SBI Card
> या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 499 रुपये आहे.
> वेलकम बेनिफिट – पहिल्या सेटल्ड ट्रान्सझॅक्शन नंतर 750 रुपयांच्या Paytm First Membership सुविधा उपलब्ध असेल.
> 1 टक्के फ्यूल सरचार्ज वेवर
> 2 लाख रुपयांचा सायबर फ्रॉड इंश्योरेंस
> एका वर्षामध्ये एक लाख रुपये स्पेंड केल्यानंतर यूजरला Paytm First Membership चे ई-वाउचर मिळते
स्पेंड बेस्ड कॅशबॅक
a. Paytm अॅपद्वारे ट्रॅव्हल, मूव्ही आणि मॉल शॉपिंगवर 3% अनलिमिटेड कॅशबॅक
b. Paytm अॅपद्वारे इतर कॅटेगिरी मध्ये स्पेंड केल्यावर 2% अनलिमिटेड कॅशबॅक
c. इतर सर्व ट्रान्सझॅक्शन वरही 1% अनलिमिटेड कॅशबॅक
d. कॅशबॅक गिफ्ट व्हाउचर म्हणून उपलब्ध असेल. विशेष गोष्ट अशी आहे की, सेटल्ड ट्रान्सझॅक्शन पूर्ण झाल्यावर 3 दिवसांच्या आत कॅशबॅक उपलब्ध होईल.
e. कोणत्याही वॉलेट लोड आणि फ्यूल स्पेंडवर कोणतेही कॅशबॅक असणार नाही.
Paytm SBI Card SELECT
> या क्रेडिट कार्डची वार्षिक फी 1499 रुपये आहे. मात्र, एका वर्षामध्ये दोन लाख रुपये स्पेंड केल्यानंतर वार्षिक फी रिव्हर्स करण्यात येईल.
> वेलकम बेनिफिट – पहिल्या सेटल्ड ट्रान्सझॅक्शन नंतर 750 रुपयांच्या Paytm First Membership ची सुविधा उपलब्ध असेल. तसेच 750 रुपयांचे कॅशबॅक उपलब्ध असेल.
> 1 टक्के फ्यूल सरचार्ज वेवर
> 2 लाख रुपयांचा सायबर फ्रॉड इंश्योरेंस
> एका वर्षामध्ये रुपये स्पेंड केल्यानंतर यूजरला Paytm First Membership चे ई-वाउचर मिळते
स्पेंड बेस्ड कॅशबॅक
a. Paytm अॅपद्वारे ट्रॅव्हल, मूव्ही आणि मॉल शॉपिंगवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक
b. Paytm अॅपद्वारे इतर कॅटेगिरी मध्ये स्पेंड केल्यावर 2% अनलिमिटेड कॅशबॅक
c. इतर सर्व ट्रान्सझॅक्शन वरही 1% अनलिमिटेड कॅशबॅक
d. कॅशबॅक गिफ्ट व्हाउचर म्हणून उपलब्ध असेल. विशेष गोष्ट अशी आहे की, सेटल्ड ट्रान्सझॅक्शन पूर्ण झाल्यावर 3 दिवसांच्या आत कॅशबॅक उपलब्ध होईल.
e. कोणत्याही वॉलेट लोड आणि फ्यूल स्पेंडवर कोणतेही कॅशबॅक असणार नाही.
माईलस्टोन कॅशबॅक
> वर्षामध्ये 4 लाख खर्च केल्यावर 2 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर
> वर्षात 6 लाख खर्च केल्यावर 4 हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.