हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : गेल्या आठवड्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये पीएफ खातेधारकांना मोठी भेट देण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातील नवीन नियमांनुसार आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यावर जास्त टॅक्स भरावा लागणार नाही. कारण अर्थमंत्र्यांकडून अशा पैसे काढण्यावरील TDS कमी केला गेला आहे. आता PF खातेधारकांना 30% ऐवजी फक्त 20% TDS भरावा लागणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले की, ज्या पीएफ खातेधारकांचे पॅन कार्ड आपल्या खात्याशी लिंक केले गेलेले नाही त्यांना आता पैसे काढताना कमी TDS भरावा लागेल. याचा फायदा अशा पीएफ खातेधारकांना मिळेल ज्यांच्या पॅनकार्डचे डिटेल्स EPFO सोबत अपडेट केलेले नाहीत. अशा प्रकरणांमध्ये, पैसे काढल्यावर 30% ऐवजी फक्त 20% TDS कापला जाईल. PF Account
आता PF वर किती TDS कापला जाईल ???
इन्कम टॅक्सच्या सध्याच्या नियमांनुसार, जर PF खातेधारकाने खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढले आणि आपले पॅन डिटेल्स EPF खात्याशी अटॅच केले असेल, तर पैसे काढल्यावर त्याला 10 टक्के दराने TDS द्यावा लागेल. तसेच, ज्या खातेदारांचे पॅन कार्ड खात्याशी लिंक केलेले नाही, त्यांना आता पैसे काढल्यावर 30 टक्के दराने TDS द्यावा लागेल. मात्र, अशा खातेदारांना TDS वाचवण्यासाठी फॉर्म 15G/15H सबमिट करता येऊ शकेल, जो EPFO द्वारे PAN च्या बदल्यात स्वीकारला जाईल. PF Account
5 वर्षाआधी पैसे काढल्यास होईल दुप्पट नुकसान
जर एखाद्याने 5 वर्षापूर्वी पीएफमधून पैसे काढले तर त्याला दुप्पट नुकसान सहन करावे लागेल. हे जाणून घ्या कि, सध्याच्या इन्कम टॅक्सच्या कायद्यानुसार, पैसे काढल्यावर TDS कापला जातो आणि खातेधारकाला पीएफवर 80C कर सूटही संपते. त्याच वेळी, 5 वर्षांनंतर पैसे काढल्यावर, TDS स्वरूपात कर भरावा लागत नाही आणि PPF वर 80C कर सूट देखील मिळते. PF Account
अर्थसंकल्पामध्ये आणखी कोण-कोणते बदल झाले ???
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएफ खात्यातून पैसे काढण्याबाबत इतरही काही बदल करण्यात आले आहेत. जर PF खात्यातून काढलेली रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असेल तर त्यावर कपातीचा लाभ मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, पीएफ खात्याशी पॅन लिंक असूनही 5 वर्षाआधी पैसे काढल्यास, 20% दराने TDS कापला जाईल. हे जाणून घ्या कि, याआधी वर नमूद केल्याप्रमाणे 10% दराने TDS कापला जात होता. PF Account
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.epfindia.gov.in/
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा