हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपल्याकडेही EPFO चे खाते असेल, तर आता PF शी संबंधित कोणत्याही समस्येचे निराकरण करणे आता आपल्यासाठी सोपे झाले आहे. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) यांनी देखील आपल्या ग्राहकांना तक्रारीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जर EPF खातेधारकास EPF मधून पैसे काढणे, EPF खाते ट्रान्सफर , केवायसी इत्यादी संबंधित काही तक्रार असेल तर तो या ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टमद्वारे तक्रार देऊ शकतो. याशिवाय आपण ईपीएफओ @socialepfo च्या ट्विटर हँडलवर तक्रार किंवा क्वेरी देखील करू शकता.
तक्रार कशी करावी
https://epfigms.gov.in/ वर जा.
तक्रार नोंदविण्यासाठी ‘रजिस्टर ग्रीवांस’ वर क्लिक करा.
आता एक नवीन वेबपेज उघडेल. यामध्ये ज्या तक्रारी दाखल केल्या आहेत त्या स्टेटसची निवड करा. स्टेटस म्हणजे पीएफ सदस्य, ईपीएस पेन्शनर, मालक किंवा इतर. तुमच्याकडे यूएएन / पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) नसेल तरच ‘अन्य’ पर्याय निवडा.
पीएफ खात्याशी संबंधित तक्रारीसाठी ‘पीएफ मेंबर’ स्टेटस निवडावे लागेल. यानंतर, यूएएन आणि सिक्योरिटी कोड प्रविष्ट करा आणि ‘गेट डिटेल्स’ वर क्लिक करा.
यूएनएन कडून लिंक केलेले पर्सनल डिटेल संगणकाच्या स्क्रीनवर दिसू लागतील.
आता ‘गेट ओटीपी’ वर क्लिक करा. यानंतर ईपीएफओ डेटाबेसमधील आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर वन-टाइम पासवर्ड पाठविला जाईल.
ओटीपी प्रविष्ट केल्यावर याची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल विचारला जाईल.
पर्सनल डिटेल प्रविष्ट केल्यानंतर, पीएफ क्रमांकावर क्लिक करा ज्यासंदर्भात तक्रार दाखल करायांची आहे.
आता स्क्रीनवर एक पॉप-अप दिसेल. यामध्ये आपल्या तक्रारी संबंधित रेडिओ बटण निवडा.
तक्रार कॅटेगिरी निवडा आणि तुमच्या तक्रारीचा तपशील द्या. आपल्याकडे काही पुरावा असल्यास ते ही अपलोड केले जाऊ शकतात.
एकदा तक्रार नोंदविल्यानंतर ‘अॅड’ वर क्लिक करा आणि सबमिटवर क्लिक करा.
यानंतर तक्रार नोंदविली जाईल आणि आपल्या रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाइल क्रमांकावर एक कम्प्लेंट रजिस्ट्रेशन क्रमांक येईल. त्याला सांभाळून ठेवा.
आपल्या तक्रारीचे स्टेटस अशा प्रकारे तपासा
तक्रार नोंदवल्यानंतर आपण ईपीएफओच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकता. यासाठी आपल्याला हे काम करावे लागेल:
https://epfigms.gov.in/ वर जा.
‘व्यू स्टेटस पर्याय निवडा.
कंप्लेंट रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाइल क्रमांक / ईमेल आयडी आणि सिक्योरिटी कोड प्रविष्ट करुन सबमिट करा.
आता आपल्या तक्रारीची स्थिती संगणक स्क्रीनवर दिसून येईल. आपल्या तक्रारीवर ईपीएफओचे कोणते प्रादेशिक कार्यालय कार्यरत आहे आणि त्या अधिकाऱ्याचे नावही येथे दर्शविले जाईल. आपण प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयाशी संपर्क साधायचा असल्यास, ईमेल पत्ता आणि फोन नंबरही स्क्रीनवर दिसून येईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.