प्रेक्षक नसलेल्या मैदानात क्रिकेट खेळणे म्हणजे नवरी नसताना लग्न करणे – अख्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्ता संपूर्ण जगात कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरु आहे. काही ठिकाणी यामध्ये सूट देण्यात आली आहे, तर काही देश कठोरपणे त्याची अंमलबजावणी करीत आहेत. अशा परिस्थितीत जगभरात विविध खेळांच्या संघटनांवर अजूनही या संकटाचे ढग जमा आहेत.

परिस्थिती सामान्य झाल्यानंतरही क्रिकेट मालिका किंवा स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचा विचार सध्या केला जात आहे. यातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला असे वाटत आहे की,’रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्यासारखे असेल.’

कोविड १९ साथीच्या आजारामुळे जवळजवळ सर्वच खेळ हे रिकाम्या स्टेडियममध्ये घेण्याचे सध्या नियोजन करण्यात येत आहेत. भविष्यात कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रेक्षकांना घरातूनच खेळाचा आनंद घ्यावा लागेल.

माजी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हॅलो ऍप लाइव्हवर झालेल्या मुलाखतीत म्हणाला की , “रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे व्यवहारी तसेच टिकाऊ असेल मात्र आपल्याला त्याचा प्रचार करायला हवा असे मला तरी वाटत नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणे म्हणजे वधूशिवाय लग्न करण्यासारखे असेल. कोणताही सामना खेळण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होणे आवश्यकच आहे. मी अशी अपेक्षा करतो की या वर्षाच्या अखेरीस ही कोरोनाची परिस्थिती सामान्य स्थितीत परत येईल. “

यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळण्याविषयी आपले मत दिले होते. तो म्हणाला होता,’रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे हे खूप कठीण होईल. प्रेक्षकांशिवाय ती जादू तयार करणे आणि भरलेल्या स्टेडियममध्ये येणारा उत्साह आणणे कठीण होईल.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.