काय बोलतील पंतप्रधान मोदी; आज रात्री ८ वाजता देशाला करणार संबोधित

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते देशवासियांना मार्गदर्शन करणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यूच आवाहन केलं होतं. देशभरात पंप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

तसेच करोनाच्या संकटात आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी मोदींनी रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटे टाळया आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होत.  राजकीय क्षेत्रातील अनेक नेते मंडळी,चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार यांसोबतच देशभरातील नागरिकांनी वैद्यकीय कर्मचार्याचे आभार मनात टाळया आणि थाळ्या वाजवत उदंड प्रतिसाद दिला होता. त्यामुळं आज पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करतांना काय म्हणतील याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान, देशभरात करोना विषाणूचा संसर्ग जलद गतीने वाढत असून आतापर्यंत एकूण ४७१ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर या आजाराने देशभरात ९ जणांचा बळी घेतला आहे. महाराष्ट्रात करोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०१ पर्यंत पोहोचली आहे.जगभरात या विषाणूमुळे आतापर्यंत १६ हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरात साडेतीन लाखापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: ‘लॉकडाऊन’ तसंच ५४८ जिल्हे लॉकडाऊन आहेत. ट्रेन, बस सेवा, मेट्रो सेवा, दुकाने ३१ मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here