हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना फ्रान्सचा सर्वोच्च मानला जाणारा “लीजन ऑफ ऑनर” (Legion of Honor) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवण्यात आलेले नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. फ्रान्सकडून जगातील विशेष काम करणाऱ्या नेत्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
नरेंद्र मोदी हे १३ ते १४ जुलै रोजी फ्रान्सच्या दौऱ्यावर होते. फ्रान्समध्ये देशाचा इतिहास आणि लष्करी ताकद दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याता आला होता. यासाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये महत्वाचे करार होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर आज मोदी यांना फ्रान्सने लीजन ऑफ ऑनर पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या पुरस्काराचे आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स, किंग चार्ल्स, माजी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल मानकरी ठरले आहेत.
दरम्यान काल मोदी फ्रान्सच्या विमानतळावर पोहल्यानंतर त्यांचे फ्रान्सचे पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी स्वागत केले. भारतासाठी फ्रान्स हा दीर्घकाळापासून महत्वाचा संरक्षण भागीदार आहे. आता फ्रान्स आणि भारताचे मैत्रिचे नाते आणखीन घट होताना दिसत आहे. यापूर्वी नरेंद्र मोदी अनेक मोठ्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना वेगवेगळ्या देशातून गौरविण्यात आले आहे.
इजिप्तकडून मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने सन्मानित आले आहे. त्याचबरोबर कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू’ हा पुरस्कार पापुआ न्यू गिनीकडून देण्यात आला आहे. ‘अबकल’ हा पुरस्कार देखील त्यांना पलाऊ देशाने दिला आहे. अशा कित्येक पुरस्कारांचे नरेंद्र मोदी मानकरी ठरले आहेत. त्यामुळे परदेशात सुद्धा मोदींची जादू कायम पाहायला मिळत आहे.