बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामध्ये सिद्धेश्वर संकुल परिसरात अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग (molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नागरिकांनी एका रोड रोमिओला भर रस्त्यात चांगलाच चोप दिला आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर विनयभंग (molestation) व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जफर रहिमोद्दिन इनामदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी रोडरोमिओचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
बीडच्या माजलगावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल एका दिवसांत दोन मुलींची छेड काढून विनयभंगाचा (molestation) प्रकार समोर आला आहे. यावेळी नागरिकांनी एका रोड रोमिओला चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकारानंतर आता पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका आरोपीने आपल्याच मुलीवर अतिप्रसंगाचा (molestation) प्रयत्न केला. हा आरोपी दारूच्या आहारी गेला होता. दारूच्या नशेत तो घरच्यांना त्रास देत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी राहण्यासाठी गेली होती. या आरोपीला दोन मुली आहेत. या मुलींचा सांभाळ मुलींचे आजी, आजोबा करतात.
हे पण वाचा :
खास फुटबॉलप्रेमींसाठी Jio ने लाँच केला जबरदस्त प्लॅन
दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली, कोट्यवधींचा गंडा घातला; कोणी केला गंभीर आरोप
मजबूत बॅटरी अन् 50MP कॅमेरा असलेला Tecno Pova 4 स्मार्टफोन भारतात लॉन्च
दिल्लीतील विजयानंतर ‘आप’चा ‘रिंकीया के पापा’ या गाण्यावर डान्स करत जल्लोष
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका