“#केजरीवालनामहै_उसका” ट्विटरवर ट्रेंडिंगला, दिल्लीकरांकडून भाजप, काँग्रेसवर धुव्वाधार टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली निवडणुकांसाठी अवघ्या २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना दिल्लीतील सामान्य नागरिकांनीही प्रचारात सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. रिक्षावाले, सामान्य नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक यांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची निवडणूक मोहीम हाती घेतली असून हटक्या पद्धतीने प्रचार करायला सुरुवात केली आहे. या संदर्भात #केजरीवालनामहै_उसका हा मथळा ट्विटरवर पहिल्या १० ट्रेंडिंग हॅशटॅगमध्ये … Read more

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन

शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्यासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमित संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींची शिवरायांशी तुलना असह्य; संभाजीराजे भाजपवर संतापले

शिवाजी महाराजांचे वंशज भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून भाजपनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

कितीही विरोध करा, CAA परत घेतला जाणार नाही; अमित शहांनी विरोधकांना सुनावले

लखनऊ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशात उठलेलं वादळ अजून शांत व्हायला तयार नाही. या कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजपने या कायद्याच्या समर्थनार्थ सभा, रॅली सुरू केल्या आहेत. लखनऊ येथे CAA च्या समर्थनार्थ बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर तोफ डागली. त्यांनी म्हंटले की, ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी करावा पण मी … Read more

‘नाइट लाइफ’ला भाजप नेत्याचा विरोध; म्हणे मद्यसंस्कृती वाढून महिलांवरील अत्याचारात वाढ होईल

मुंबई ‘नाइट लाइफ’च्या प्रस्तावाला सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता या नाइट लाइफच्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे.

चले जाओ, हा हिंदूस्तान आहे पाकिस्तान-बांगलादेश नाही; मनसेची पुण्यात पोस्टरबाजी

टीम हॅलो महाराष्ट्र : मनसेचे अधिवेशन येत्या २३ जानेवारीला होणार असून या अधिवेशनात मनसेची पुढील दिशा ठरणार आहे. या आधीच पुण्यामध्ये मनसेच्या पोस्टरबाजीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. चले जाओ, हा हिंदुस्थान आहे, पाकिस्तान किंवा बांगलादेश नाही, अशा विधानाचे पोस्टर पुण्याच्या विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. मनसेला या पोस्टरद्वारे कोणाला इशारा दयायचा आहे, हे मात्र … Read more

मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पक्षाचा झेंडा गायब, उरलं केवळ इंजिन

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते.

CAA मध्ये मुस्लिमांचाही समावेश करा – माजी राज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली : नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या बाहेर निदर्शने सुरू आहेत. सोमवारी दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) नजीब जंग देखील येथे पोहोचले आणि निदर्शकांना संबोधित केले. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेले नजीब जंग म्हणाले की सरकारने सीएए बदलला पाहिजे. मुस्लिमांनाही यात सामील केले पाहिजे. Delhi’s Ex-Lieutenant Governor, Najeeb … Read more

ज्यांना जनतेनं नाकारलं तेच आता खोटं बोलत आहेत; CAA कायद्यावरून मोदींचा काँग्रेसवर आरोप

भाजपच्या अध्यक्षपदी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्याचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन केले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी CAA कायद्याबाबत काँग्रेसवर जनतेत अफवा पसरवत असल्याचा आरोप केला.