मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय.
“पूजा चव्हाणची आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर दोन दिवसात ज्या काही अपडेट येत आहेत ते व्हायरल होत आहे. काही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. त्या सर्व क्लिप धक्कादायक आहेत. या सगळ्या गोष्टींचा रोख मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. भाषणात महिला सुरक्षेवर बोलणं सोपं असतं. आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करावी. एवढे पुरावे असताना तुम्ही आता वाट कुणाची बघत आहात? अशा लोकांच्या मुसक्या आवळायलाच हव्यात”, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचं नाव पुढे आपल्यावर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही सावध प्रतिक्रिया दिलीय. ”झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.