हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुमची कमाई 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुमच्याकडे आतापर्यंत रिटायरमेंट साठीचे कोणतेही नियोजन नसेल तर आता काळजी करण्याची गरज नाही. मोदी सरकारची ही नवीन पेन्शन योजना तुम्हाला त्यासाठी मदत करू शकते. 60 वर्षानंतर तुम्हाला दरमहा 3,000 रुपये किंवा वर्षाकाठी 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.
18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचे नाव आहे पीएम श्रम योगी मानधन योजना. चला तर मग या बद्दल तपशीलवार जाणून घेऊयात …
55 रुपयांच्या योगदानासह मिळवा 3000 पेन्शन
या योजनेत वेगवेगळ्या वयाप्रमाणे 55 ते 200 रुपये मासिक अनुदान देण्याची तरतूद आहे. वयाच्या 18 व्या वर्षी जर आपण या योजनेत सामील होत असाल तर तुम्हाला दरमहा 55 रुपये द्यावे लागतील. त्याचवेळी, 30 वर्षांच्याना 100 रुपये आणि 40 वर्षांच्याना 200 रुपयांचे योगदान द्यावे लागेल. जर आपण 18 वर्षांचे असाल तर वार्षिक योगदान 660 रुपये असेल. जर आपण असे 42 वर्षे करत असाल तर आपली एकूण गुंतवणूक 27,720 रुपये होईल. त्यानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन आजीवन दिले जाईल. खातेदार जेवढे योगदान देतील तितकेच सरकार त्यांच्या वतीने तितकेच योगदान देईल.
हे कोण खाते उघडू शकते
या पीएम-एसवायएम योजनेत असंघटित क्षेत्रातील लोक किंवा ज्या लोकांचे उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना खाते उघडता येते. याची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. आपल्याकडे आधीपासूनच ईपीएफ / एनपीएस / ईएसआयसी खाते असल्यास आपल्याला हे खाते उघडता येणार नाही. यासाठी आपले उत्पन्न हे करपात्र असू नये.
नोंदणी कशी करावी
या प्रधान मंत्री श्रमयोगी मंदिर पेन्शन योजनेत नोंदणी करण्यासाठी आपल्याला जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यावी लागेल. यानंतर, आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते याविषयीची माहिती आयएफएससी कोडसह द्यावी लागेल. पुरावा म्हणून पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंटही दिले जाऊ शकते. खाते उघडताना आपण नॉमिनीची देखील नोंदणी करू शकता.
एकदा आपला डिटेल्स कॉम्प्युटरमध्ये रजिस्टर्ड झाल्यावर आपल्याला मासिक योगदानाबद्दल माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला तुमचे प्रारंभिक योगदान कॅश स्वरूपात द्यावे लागेल. यानंतर, आपले खाते उघडले जाईल आणि आपल्याला श्रम योगी कार्ड मिळेल. या योजनेची माहिती आपण 1800 267 6888 टोल फ्री क्रमांकावरही मिळवू शकता.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in