देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांनी रडण्याचं नाटक करु नये; प्रकाश आंबेडकर यांची टीका

Prakash Ambedkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. या मुद्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. “ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर राज्यातील चारही पक्षांकडून जनतेची फसवणूक केली जात आहे. देवेंद्र फडवणीस आणि इतर भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करू नये,” अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले नसून कोणत्या आधारावर देताय त्याचे स्पष्टीकरण मागितले आहे. अशात भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मगरीचे अश्रू दाखवत रडण्याचे नाटक करु नये, असा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबतही महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाशी आपण युती करायला तयार आहे, असे आंबेडकर यांनी म्हंटले.