“देवेंद्र फडणवीसांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण”; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आज पोलिसांकडून दोन तास चौकशी करण्यात आली. दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणी सायबर पोलिसांनी केलेल्या चौकशी प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फडणवीसांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना मैदानी दिलेर समजत होतो. पण त्यांचा दिलेर पनाही ही दिसला नाही, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. आंबेडकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण म्हणजे गांडूचे राजकारण आहे. मला वाटले फडणीस आपला मैदानीपणा दाखवतील. मात्र, त्यांचा मैदानीपणा ही दिसला नाही. त्यांनी जी टेप स्पीकरला दिली, सभागृहात दिली. याला सामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे असेल तर गांडूचे राजकरण केले

माझे फडणवीसांना हेच आंगणे आहार की, दिलेर पणाचे राजकारण जर करायचे असेल तर त्यांनी ती टीप लोकांसमोर जाहीर केली पाहिजे. फडणवीसांनी ती टेप लोकांसमोर दिली असती तर पोलिसांनी नोटीस दिली नसती. पोलिसांनी दाबण्यासाठी नोटिस दिल्याचेही आंबेडकर म्हणाले आहेत.