Tuesday, October 4, 2022

Buy now

‘मविआ’ सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनेच उचलला होता; आंबेडकरांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा हात आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता असा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिले. सांगली येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी करायला तयार आहोत, मात्र आमच्या प्रस्तावाला त्यांच्याकडून अद्याप अधिकृतपणे प्रतिसाद आला नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर महाविकास आघाडी सरकार पाडल्याचा आरोपही केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विडा जे कोणी उचलला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसनेच उचलला असा थेट आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपाला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येत हे आता पहावं लागेल.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. तर भारत जोडायला तो तुटला कुठं आहे??असा सवाल करत त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टीका केली.