हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणी महाविकास आघाडीने मलिक याचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला आहार. यावरून भाजपचे नेते विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला. आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच राहिलो नाही तर राजीनामा घेऊन करायचे काय? या उद्देशाने “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकासआघाडी सरकारचे सुरु आहे,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
आज प्रवीण दरेकर यांनी ईडीच्या मलिकांवरील होत असलेल्या कारवाईवरून भाजपवर होत असलेल्या आरोपा प्रकरणी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी दरेकर यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच राहिलो नाही तर राजीनामा घेऊन करायचे काय? या उद्देशाने “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असे महाविकासआघाडी सरकारचे सुरु आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला आणि जर राष्ट्रवादीने सरकारचे पाठबळ काढायचे ठरवले तर आपणच राहिलो नाही तर राजीनामा घेऊन करायचे काय? या उद्देशाने "तेरी भी चूप, मेरी भी चूप" असे महाविकासआघाडी सरकारचे सुरु आहे.@CMOMaharashtra @nawabmalikncp #NawabMalik #MVA pic.twitter.com/6G9Bqj6UUS
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) February 24, 2022
नवाब मलिक यांनी नैतिकदृष्टया राजीनामा देणे आणि मुख्यमंत्र्यांनी तो घेणे अपेक्षित होते. परंतु राष्ट्रवादीचा राजीनामा ते घेऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या पाठिंब्यावर सरकार आहे. त्यामुळे सरकार टिकवणे ही सर्वांची प्राथमिकता झाली आहे. ईडीची मलिक यांच्यावरील कारवाई कायद्याच्या चौकटीतच आहे. ईडी ही केंद्राची एक महत्वाची तपास यंत्रणा आहे. त्यामुळे ती अधिकार चाचपून कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करत असते, असे दरेकर यांनी म्हंटले.