हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजपवर निशाणा साधत अनेक आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. राऊतांनी आज भाजपचे साडेतीन नेते यांची नावे जाहीर करू असे सांगितले. मात्र, त्यांनी एकही नेत्याचे नाव घेतले नाही. मला वाटते आजची प्रकार परिषद म्हणजे फुसका बार म्हणावा लागेल, असा टोला दरेकर यांनी लगावला.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. दरेकर म्हणाले की, पत्रकार परिषद घेत छातूरमातूर गोष्टी करून काय होणार नाही. राऊतांना एवढंच सांगणे आहे कि त्यांनी बोलण्यापेक्षा थेट पुरावे द्यावेत. किरीट सोमय्यांना जेलमध्ये टाकावे.
वास्तविक पाहता आज पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते. एकतर सरकार तुमचं ऐकत नाही. राऊत हे सध्या तोंडावर आपटले आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली.