हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीमागील सत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आता जुन्या काळातील गोष्टी सांगून काय उपयोग होणार नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची भेट झाली असेल. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते त्यांनाच माहिती आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. आज काय उद्या काय होणार यावर चर्चा करणे जास्त महत्वाचे होईल आपण आता शेतात तुरीच्या भट भटणीला मारू अशी वक्तव्ये करायला अर्थ नाही, असे दरेकर यांनी म्हंटले.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्या दोघांच्यामध्ये काय चर्चा झाली याचे आपण साक्षीदार नाही. आता या चर्चांवर बोलून काय उपयोग होणार नाही. ते दोघेच त्यांच्यात झालेल्या चर्चेबाबत बोलू शकतील. आता शिळ्या कढीला ऊत आणण्यात काय उपयोग आहे. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुढे काय होणार? काय करायचे? याकडे आता लक्ष दिले पाहिजे.
🎥 थेट प्रक्षेपण 🎥
प्रसार माध्यमांशी संवाद
📍 स्थळ:- अंवती शासकीय निवासस्थान, मुंबईhttps://t.co/IUwqJYLe7y
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) December 30, 2021
यावेळी दरेकर यांनी नितेश राणे यांच्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नितेश राणे यांना आज होत असलेल्या निवडणुक प्रक्रियेपासून लांब ठेवायचे. जेणेकरून प्रचारावर परिणाम होईल. त्याचबरोबर नारायण राणे यांच्यावर एक प्रकारे दबाव आणायचा अशा प्रकारे सत्तेचा वापर करून सिधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत या सरकारकडून केला जात असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी केला.