हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे – अहमदनगर – औरंगाबाद द्रुतगती मार्गाच्या 268 किमी लांबीच्या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे आता यासाठीच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पुणे – औरंगाबाद हा एक्स्प्रेस वे फक्त महाराष्ट्रातील उदयोन्मुख मेगा शहरांनाच जोडला जाणार नाही तर तो पुणे आणि नागपूर मार्गे लवकरच उद्घाटन होणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी एक्स्प्रेस वेला देखील लिंक केला जाणार आहे.
हा एक्स्प्रेस वे पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, हवेली, दौंड आणि शिरूर तालुक्यातून जाणार आहे. यामुळे या तालुक्यांतील उपविभागीय अधिकाऱ्यांची आपापल्या तालुक्यातील भूसंपादनासाठी सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली होती. आता पुणे आणि छत्रपती संभाजी नगर (पूर्वीचे औरंगाबाद) दरम्यानचा हा नियोजित एक्स्प्रेस वे पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या चौकातून पुण्याच्या बांधकामाधीन असलेल्या रिंग रोडपासून सुरू होईल आणि छत्रपती संभाजी नगरजवळील समृद्धी एक्सप्रेसशी जोडला जाईल.
नागरी केंद्रांमधील रहदारी आणि सध्याच्या रस्त्यांच्या जाळ्यातील पॅचमधील खराब रस्ते यामुळे, नागपूर ते पुणे दरम्यानचे 716 किमी अंतर कापण्यासाठी 14-16 तास लागतात. परंतु आता पुणे- अहमदनगर- औरंगाबाद एक्स्प्रेस वे पूर्ण झाल्यानंतर नागपूर -पुणे प्रवास फक्त आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. हा महामार्ग 6 किंवा 8 पदरी असू शकतो.
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ, आजचे नवीन दर पहा
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेस कडून गुजरात निवडणुकीची जबाबदारी
खुनाचा गुन्हा चालेल पण विनयभंगाचा नाही; जितेंद्र आव्हाड भावुक
मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे पुन्हा संतापले; म्हणाले, काम करायचं नसेल तर…
बाबा रामदेवांना धक्का : पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी