हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। पोस्ट ऑफिसच्या बचत योजना या नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय राहिल्या आहेत. अधिक फायदा आणि टॅक्स वर सूट मिळणार असेल तर ती सुविधा उत्तमच होय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही अशीच एक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीसाठी आयकर विभागाने ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयकर विभागाने सेक्शन ८०सी, ८०डी अंतर्गत बचत आणि गुंतवणुकीची तारीख ३० जून ची ३१ जुलै करण्यात आली आहे. या योजनेत आपण केवळ १०० रुपये देखील गुंतवू शकता. यामध्ये १००, ५००, १०००, ५००० अशी प्रमाणपत्रे मिळतात. यात गुंतवणुकीची कोणती मर्यादा नाही आहे. गुंतवलेल्या पैशावर सध्या वार्षिक ६.८% व्याज मिळते आहे.
कोणीही व्यक्ती स्वतःच्या, मुलांच्या नावावर ही प्रमाणपत्रे खरेदी करू शकते. यांची परिपक्वता मुदत ५ वर्षाची असते. दरवर्षी व्याज जोडले जाते आणि चक्रवाढ पद्धतीने पैसे वाढत जातात. आता गुंतवलेले १०० रु ५ वर्षांनी १४४रु होतात. मात्र केवळ १.५ लाखांपर्यंतच्या रकमेवरच टॅक्सवर सूट मिळते. योजना सरकारी असल्यामुळे खात्रीशीर आहे. याची परिपक्वता मुदत ५ वर्षे असली तरी १ वर्षाने काही अटी पूर्ण करून पैसे काढू शकतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये दर तीन महिन्यांनी व्याज बदलले जाते किंवा निर्धारित केले जाते. म्हणूनच गुंतवणूकदारांना वाढत्या आणि कमी होणाऱ्या व्याजासोबत रकमेत करावा लागतो.
व्याज दर घटले तरी चांगली रक्कम मिळते. १०,०००रु गुंतवले तर परिपक्वता झाल्यावर १३,८९०रु मिळतात. सोबत टॅक्समध्ये देखील सूट मिळते. दरवर्षी १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर अधिनियम धारा ८०सी टॅक्स वर सूट मिळते. १८ वर्षाचे लोक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये हे प्रमाणपत्र ट्रान्सफर करू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.