पुणे : हॅलो महाराष्ट्र – आज भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा T-20 सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याच्या अगोदर टीम इंडियाने संघात दोन मोठे बदल केले आहेत. या सामन्यात अर्शदीप सिंह आणि राहुल त्रिपाठी (rahul tripathi) यांना संधी देण्यात आली आहे. राहुल त्रिपाठीने (rahul tripathi) आजच्या सामन्यात टी 20 सामन्यात पदार्पण केले आहे. त्याने या सामन्यात पदार्पण करताच थेट दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. राहुल त्रिपाठीने 31 व्या वर्षी टी 20 पदार्पण केले आहे. असा कारनामा करणारा तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड नंतर तिसरा वयस्कर खेळाडू ठरला आहे. तसेच 102 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.
राहुल त्रिपाठी (rahul tripathi) हा श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या टी 20 मालिकेतून डेब्यू करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. याअगोदर मुंबईमध्ये पार पडलेल्या सामन्यात शिवम मावी आणि शुबमन गिल या दोघांनी डेब्यू केलं होतं. राहुल त्रिपाठीच्या (rahul tripathi) अगोदर सचिन तेंडुलकर यांनी 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी 20 डेब्यू केलं होतं. त्यानंतर राहुल द्रविडने इंग्लंड विरुद्ध 31 ऑगस्ट 2011 ला पदार्पण केलं होतं.
Congratulations to Rahul Tripathi who is all set to make his T20I debut for #TeamIndia 🇮🇳👏#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/VX1y83nOsD
— BCCI (@BCCI) January 5, 2023
दुसऱ्या टी 20 साठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, शिवम मावी, अर्शदीप सिंह, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहल.
श्रीलंका प्लेईंग इलेव्हन : दासुन शानका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, धनंजया डिसिल्वा, चरित असालंका, भानुका राजपक्षे, वानिंदु हसारंगा, चामिका करुणारत्ने, महीष तीक्षणा, कासुन रजिता आणि दिलशान मधुशंका.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती