ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

व्हायरल बिरबल । विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेत पावसाचं विघ्न आलं. लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे शांत असल्याने ते काय बोलणार? याची उत्सुकता सगळ्यांना आहे. मात्र आता त्यांची खिल्ली उडवण्याचं काम सोशल मीडियावर सुरु झालं आहे. ‘पुन्हा  नरेंद्र पुन्हा देवेंद्र मिशन २०१९’ या फेसबुक पेजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

या फेसबुक पेजवर राज ठाकरे यांचा गंभीर फोटो दाखवण्यात आला आहे. तर एक स्माईली खळखळून हसताना दाखवण्यात आली आहे. त्यानंतर, आमचे साहेब १० वाजता उठणार, १२ वाजता नाश्ता करणार, २ वाजता जेवणार, त्यानंतर परत थोडी वामकुक्षी, मग ५ ला सभेच्या ठिकाणी जायला निघणार, मग ८ वाजता सभा घेणार तोवर देवेंद्रजींच्या ३ सभा झालेल्या असतात. ऐसा कैसा चलेगा राजू, कौन देगा तुझे सत्ता का बदाम और काजू ! असा प्रश्न विचारुन देवेंद्र फडणवीस खळखळून हसताना दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान भाजपाचे हे अधिकृत फेसबुक पेज नाही. मात्र भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी राज ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे तर काहींनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.