सातारा पोलीस सदावर्तेना का ताब्यात घेणार होते? राजेंद्र निकम यांची हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. दरम्यान अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी पाटण तालुक्यातील तारळे येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम यांनी सदावर्ते यांच्या विरोधात दीड वर्षांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आज सातारा पोलिसांनी सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजेंद्र निकम यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ला पहिली प्रतिक्रिया दिली.

यावेळी तक्रारदार राजेंद्र निकम यांनी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागचे कारण सांगितले. यावेळी मोहिते म्हणाले की, दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी गुणरत्न सदावर्ते यांनीआक्षेपार्ह्य विधान केले आहे की, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज हे अफजल खानाची औलाद आहे, अफजलच्या प्रवृत्ती आहेत. असे वारंवार आक्षेपार्ह विधान केले आहे. एका वकिली पेशा असणाऱ्या व्यक्तीने असे विधान करीत समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले.

या विरोधात आम्ही दि. 9 ऑक्टोबर 2020 रोजी सतरा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यावेळी पोलिसांकडून सांगितले जात होते कि या प्रकरणाचा आम्ही तपास करीत आहोत. या प्रकरणी काही दिवसापूर्वी मजहा सातारा जिल्हा सत्र न्यायालयात एक जबाबही नोंदवण्यात आला. आणि आज आता प्रसिद्धी माध्यमांशी माध्यमातून आम्हाला समजले कि सदावर्ते यांना सातारा पोलीस स्टेशनचे अधिकारी अटक करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आम्ही पोलिसांचे धन्यवाद मानत आहे, अशी प्रतिक्रिया निकम यांनी बोलताना दिली.