सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; अटकेची टांगती तलवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोप दाखल करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर सोमय्यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार आहे. मात्र सोमय्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे म्हटले आहे.

सोमय्या यांच्यावर ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सोमय्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.तर किरीट सोमय्या यांचे सुपुत्र निल सोमय्या यांच्या जामीन अर्जावरचा निकाल उद्या येणार आहे.

काय आहे प्रकरण-

आयएनएस विक्रांत हि युद्धनौका वाचवण्यासाठी सोमय्यांनी २०१३ ला जनतेकडून निधी जमा केला होता. हा जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावर सोमय्या यांच्यावर निशाणा साधत हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आवाहन यांनी केलं.

Leave a Comment