हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्यावतीने दोन दिवसांपूर्वी गहू, तांदूळ, तृणधान्ये, सोयाबीन आदी खाद्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्राच्या या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यांनाच जीएसटी लावला आहे. आता फक्त मरण स्वस्त, त्याला कधी जीएसटी लावणार?”,असा सवाल करत शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राजू शेट्टी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, “पेट्रोल-डिझेल-गॅस महाग, शिक्षण आवाक्याबाहेरचे, दवाखाना परवडत नाही, तेल, मीठ, चटणी, तांदूळ, डाळ, दही, साखर, वह्या-पुस्तके साऱ्यानाच जीएसटी… आता स्वस्त आहे फक्त मरण, त्याला केव्हा लावता जीएसटी ?,”
https://www.facebook.com/100044342623536/posts/pfbid02ResQsJ8nFkoNU4A9GsdMdjuixpwhBiRzdphtTm1xkt9CgBD4EKsN3EhSn2bduxqtl/
जूनच्या शेवटच्या आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत पॅकबंद आणि लेबल केलेले मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांसारख्या उत्पादनांचा जीएसटीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यावर 5 टक्के जीएसटी लावण्याबाबट चर्चा करण्यात आली. बैठकीत घेतलेला निर्णय, केलेली चर्चा यांची अंलबजावणी आजपासून करण्यात आली आहे.