हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उसाला एकरकमी एफआरपीची निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने नुकताच घेतला. सरकारच्या या निर्णयाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नुकतीच फेसबुक पोस्ट टाकत आभार मानले आहेत.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे एफआरपीचे तुकडे केले. मागच्या सरकारमधील कारखानदार नेत्यांचा तो डाव होता. एक रक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; भाजप आमदाराने तोडले अकलेचे तारे
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/gKG4KDcCQ4#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 30, 2022
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयाचे राजू शेट्टी यांनी स्वागत केले आहे.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. दोन साखर कारखान्यांमध्ये असणाऱ्या हवाई अंतराविषयी सकारात्मक निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त केले. pic.twitter.com/0I8BvcCR90
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2022
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही कुणासोबतही जाणार नाही, आम्ही स्वतंत्रपणे वाटचाल करत राहणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.
https://www.facebook.com/Rajushetti27/posts/675333927288022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महत्वाची घोषणा
राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक असून एक रक्कमी एफ. आर. पी चा कायदा राज्य सरकार पुर्ववत करून दोन टप्यातील एफ. आर. पी. चा कायदा रद्द करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली. त्याबरोबरच वजनकाटे ॲानलाईन करणे , वाहतूकदारांना महामंडळामार्फत मजूर पुरवठा करणे यासह केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयाबाबत तातडीने पाठपुरावा करून शेतकरी हिताचे सर्व धोरण राबविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांचे आभार, अशी फेसबुक पोस्ट राजू शेट्टी यांनी लिहिली आहे