मनसेच्या मंत्रीपदाबाबत रामदास आठवलेंनी केलं ‘हे’ मोठं विधान; म्हणाले की…

Ramdas Athavale Raj Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाले असले तरी, अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांना स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, शिंदेंच्या मंत्रिमंडळात मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “मनसेला मंत्रिपद देण्याचा काही विचार होत असेल तर आम्ही विरोध करू,” असे विधान आठवले यांनी केली आहे.

कल्याण येथे एका कार्यक्रमास रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी मनसेच्या मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “शिंदे सरकार मध्ये आम्हाला मंत्रिपद मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र, मनसेला मंत्रिपद देण्याबाबत सध्या चर्चा सुरु असल्याचे माझ्या ऐकण्यात येत आहे. जर शिंदे गटाकडून अथवा भाजपकडून मनसेला मंत्रीपद दिल्यास त्याला आरपीआय विरोध करणार आहे.”

“मूळ म्हणजे मनसेला नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंध नाही. मनसे हा वेगळा पक्ष आहे. तो ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे ना आमच्यासोबत आहे. तसेच मनसे निवडणूकीतही आमच्यासोबत नव्हते. त्यांना मंत्रिपद दिले तर आमचा विरोध आहे,”असे आठवले यांनी म्हंटले आहे.

विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकू : आठवले

यावेळी आठवले यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे विधानही केले. ते मनाला की, एकनाथ शिंदे यांचा गटच खरी शिवसेना आहे. आमचा शिंदे यांना पूर्ण पाठींबा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूने असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते. आगामी काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पाठींबा देऊच पण त्यासोबतच येत्या विधानसभा निवडणुकीत दोनशे जागा जिंकू, असा विश्वास यावेळी आठवले यांनी व्यक्त केला.