हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. “राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” असे आठवले यांनी म्हंटले आहे.
रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याविषयी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी काय वक्तव्य केले आहे, ते तपासून पाहणे गरजेचे आहे. राज्यपालांच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते हे खरे आहे.
समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज होते हे माध्यमांमध्ये आले आहे, ते योग्य नाही. समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. त्यांना त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांना त्यांची प्रेरणा होती ही गोष्ट खरी आहे. राज्यपालांनी माफी मागण्याचा विषय नाही. राज्यपालांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही,” असे आठवले यांनी म्हंटले.