उद्धव ठाकरेंना भाजपासोबत युती करायची होती पण राऊतांमुळे…; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

0
53
Ramdas Kadam Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊतांवर ईडी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर जेष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “उद्धव ठाकरे हे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते, मात्र तिथे संजय राऊत आले आणि सर्व फिस्कटलं,” असे कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेतून जे फुटले ते भाजपाचे गुलाम झाल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे. एवढंच सांगतो कि गुलाम कोण कोणाचं होतं हे त्यांनी आता बघावे. तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम आहात का याचा विचार केला पाहिजे, असा सवाल कदम यांनी ठाकरेंना यावेळी केला.

यावेळी कदम यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “नारायण राणे आणि नवनीत राणा यांना देखील अटक झाली होती, मात्र राऊत ज्या पद्धतीने हात दाखवून ईडीच्या कार्यालयाकडे गेले तेव्हा वाटलं मोठी लढाई लढायला चालले आहेत,असे कदम यांनी म्हटलं आहे.