“समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देताय तर मग अर्धी रक्कम द्या”; रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात राज्य सरकारने नुकताच एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे समृद्धी महामार्गाचे नाव बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे ठेवले आहे. यावरून भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. “आम्ही समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची मागणी करत होतो. तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणून राहिले. गोष्ट चांगली आहे. महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देत आहात तर 50 टक्के पैसे तुम्ही द्या, 50 टक्के पैसे आम्ही देतो, असे म्हणालो, असे दानवे यांनी म्हंटले.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्ही नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो आहोत. त्याच्याशी चर्चा करून त्यांना मुंबईपासून ते नागपूरपर्यंतचा रस्ता आपण करू असे सांगितले. तसेच समृद्धी महामार्ग झाल्यावर तुमचं-आमचं सर्वांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.

अनेकांकडून महामार्गासंदर्भात मागणी केली जात आहे. औरंगाबादपासून पुण्यापर्यंत रेल्वे मार्ग झाला पाहिजे. नगरपर्यंत झाला पाहिजे. चाळीसगावपर्यंत झाला पाहिजे. हे सर्वे रेल्वेने केले नाही. महाराष्ट्राच्या महारेलने केलेले आहेत. त्यांच्याशी बैठक झाली तर आपण राज्य सरकारला आग्रह धरू. आम्हाला कनेक्टिव्हीटी नाही. त्यामुळे टक्के 50 पैसे द्या, अशी मागणी सरकारकडून करू. अजित पवार-शरद पवारांना नाशिकपासून ते पुण्यापर्यंतचा रेल्वे मार्ग हवा आहे. मी त्यासाठी तयार आहे. पण त्यासाठी दोन्ही सरकारचा 50-50 टक्क्यांचा शेअरिंग हवा. या कामासाठी राज्य सरकार 70 टक्के शेअर देत आहे तर समृद्धी महामार्गाला का देत नाही?, असा सवाल राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

Leave a Comment