व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बाबरी पडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता, मात्र मी स्वतः तिथे होतो…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर पार पडली. या सभेतून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. यानंतर आता त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसलात याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे. हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता, असे देवेंद्र फडणवीसानंतर दानवे यांनी म्हंटले आहे.

मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कालच्या पार पडलेल्या जाहीर सभेवरून निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भाजपला आपण सोडले मात्र, हिदुत्व सोडले नाही. मात्र, त्यांना एवढंच सांगतो की, तुम्ही हिंदुत्व सोडले की नाही याचे प्रमाणपत्र आता देण्याची गरज नाही.

बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये आम्ही हिंदुत्व सोडले नाही असे म्हणण्याची कधीही वेळ आली नाही. ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या अशा लोकांच्या पंक्तीत तुम्ही जाऊन बसला आहात. याचा अर्थ तुम्ही आता हिंदुत्व सोडलेले आहे असाच होतो. हिंदुत्वाच्या गप्पा सभा घेऊन मारणे आता तुम्ही बंद केले पाहिजे. बाबरी पडली तेव्हा मी सुद्धा तिथे होतो. एकही शिवसैनिक तिथे नव्हता.

कालच्या सभेत त्यांनी केलेल्या भाषणातून सर्वांची निराशा झाली असल्यासारखे वाटते. त्यांनी केवळ सभेतून राज्यातल्या जनतेला कोणताही दिलासा न देता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले. तुम्ही म्हंटले कि मुंबई तोडण्याचा प्रयत्नकाहीजण प्रयत्न करत आहार मात्र, तुम्हाला एवढंच सांगतो की, मुंबई तोडण्याची भाषा झाली तेव्हा अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता. मुंबईला तोडण्याचा कोणाचा हेतू नाही. मुंबई अभेद्य राहणार आहे. मुंबईवर जेव्हा संकटे येतील तेव्हा पक्षभेद विसरुन आम्ही सर्व एकत्र येऊ, असेही शेवटी दानवे यांनी म्हंटले.