व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘जनतेचे प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली’; राणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसह इतर पक्षातील नेत्यांकडूनही जोरदार टीका केली जात आहे. आज युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व अमरावतीतील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “सध्या जनतेचे प्रश्न मांडले जात आहेत. अशा प्रश्न मांडणाऱ्यांना फसवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सुपारी दिली असल्याची टीका राणा यांनी केली आहे.

आमदार रवी राणा यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,
भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री तसेच ठाकरे सरकार विरोधात बोलत आहेत. म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे.

मुख्यमंत्री हे काही पोलीस अधिकाऱ्यांनी हाताशी धरून जे सरकार विरोधात बोलेल किंवा जनतेचे प्रश्न मांडेल व आमच्याशी संपर्कात असलेल्या लोकांना फसवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुपारी दिली आहे. आमचा आवाज मुख्यमंत्री दाबत आहेत. हे थांबले पाहिजे. देर आहे पण अंधेर नाही. ते भोगावे लागेत, हे लक्षात ठेवा, असा इशारा रवी राणा यांनी यावेळी दिला.