रिलायन्स आणि सन्मिना भारतात जागतिक दर्जाचे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हब स्थापन करणार

नवी दिल्ली । रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (RSBVL), रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि सन्मिना कॉर्पोरेशन यांनी भारतात इलेक्ट्रॉनिक्स हब स्थापन करण्यासाठी जॉईंट व्हेंचर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स सनमीनाच्या सध्याच्या भारतीय युनिटमध्ये 1670 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्सचा जॉईंट व्हेंचरमध्ये 50.1 टक्के हिस्सा असेल, तर व्यवस्थापन सनमिनाच्या सध्याच्या टीमकडेच राहील.

जॉईंट व्हेंचर 5G, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, हायपर स्केल डेटासेंटर्स यांसारख्या कम्युनिकेशन नेटवर्किंगला प्राधान्य देईल. हे हेल्थ सिस्टीम, औद्योगिक आणि संरक्षण आणि एरोस्पेस सारख्या उद्योगांसाठी हाय टेक्नोलॉजी हार्डवेअर देखील तयार करेल. ते JV Sanmina च्या सध्याच्या ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व्हिस देणे सुरू ठेवेल. याशिवाय, एक अत्याधुनिक ‘मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी सेंटर ऑफ एक्सलन्स’ तयार केले जाईल, जे भारतातील प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि हार्डवेअर स्टार्टअप्सच्या इको-सिस्टमला प्रोत्साहन देईल.

व्यवसाय वाढवण्यासाठी Sanmina ची मदत मिळेल
JV युनिटमध्ये RSBVL कडे 50.1% इक्विटी स्टेक असेल तर उर्वरित 49.9% सनमीनाकडे असेल. RSBVL ही मालकी प्रामुख्याने सनमीनाच्या सध्याच्या भारतीय विभागातील नवीन शेअर्स मध्ये रु. 1,670 कोटी गुंतवणुकीद्वारे मिळेल. या गुंतवणुकीमुळे सन्मीनाला आपला व्यवसाय वाढण्यास मदत होईल. चेन्नईतील सन्मिनाच्या 100 एकर कॅम्पसमध्ये सुरुवातीला सर्व बांधकाम केले जाईल. भविष्यात त्यांचा विस्तारही होऊ शकतो.

ज्युरे सोला, अध्यक्ष आणि CEO, Sanmina, म्हणाले, “आम्ही भारतात इंटीग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तयार करण्यासाठी रिलायन्ससोबत भागीदारी करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. हे जेव्ही देशांतर्गत आणि निर्यात दोन्ही बाजारांच्या गरजा पूर्ण करेल आणि भारत सरकारच्या “मेक इन इंडिया” साठी मैलाचा दगड ठरेल.

भारतात इनोवेशन आणि प्रतिभा वाढवणे
रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, “भारतातील हाय -टेक्नोलॉजी मॅन्युफॅक्चरिंगसाठी महत्त्वाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी सन्मिनासोबत काम करताना आम्हाला आनंद होईल. भारताच्या विकासासाठी आणि सुरक्षिततेसाठी स्वावलंबी होणे आवश्यक आहे. टेलिकॉम, IT, डेटा सेंटर, क्लाउड, 5G, न्यू एनर्जी आणि इतर उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वावलंबी पणा आवश्यक आहे कारण आपण नवीन डिजिटल अर्थव्यवस्थेत जात आहोत. या भागीदारीद्वारे, आपण भारतीय आणि जागतिक मागणीची पूर्तता करताना भारतातील नवकल्पना आणि प्रतिभा वाढविण्याची योजना आखत आहोत.