बंद झालेल्या पोस्ट ऑफिसची पॉलिसी पुन्हा सुरु करा; त्यासाठी तुमच्याकडे दीड महिन्याचा कालावधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जर आपण पोस्ट ऑफिसशी संबंधित एखादी पॉलिसी घेतली आहे आणि ती लॅप्स झाली आहे तर ती पुन्हा सुरु करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. पोस्ट विभागाने  पोस्ट जीवन विमा (PLI – Postal Life Insurance) आणि ग्रामीण पोस्ट जीवन विमा (RPLI – Rural Postal Life Insurance) या पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी दिली आहे. इंडिया पोस्ट ने याबाबतीत ट्विट करून माहिती दिली आहे. मागच्या आठवड्यात इंडिया पोस्ट पॉलिसी सुरु करण्याची संधी असून ३१ ऑगस्ट च्या आधी ती रिवाइज करावी लागेल असे सांगितले होते. इंडिया पोस्ट च्या पोस्ट जीवन विम्याची सुविधा सर्व सरकारी आणि अर्ध सरकारी कर्मचाऱ्यांना मिळते. सरकार ने ऑक्टोबर २०१७ मध्ये ही सुविधा इतर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली होती. तर ग्रामीण पोस्ट जीवन विमा गावातील लोकांसाठी आहे.

या ट्विट मध्ये असे सांगितले गेले आहे की, अशी पॉलिसी ३१ ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु करण्याची संधी दिली जात आहे. यासाठी जवळच्या पोस्ट विभागाशी संपर्क करावा लागेल. जवळच्या पोस्ट विभागात जाऊन पॉलिसीधारकांना लिखित अर्ज करावा लागेल. पॉलिसी पुन्हा चालू करण्यासाठी पोस्ट विभागाने १८०० १८० ५२३२ हा नंबर दिला आहे. या नंबरवर पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी संपर्क करता येऊ शकेल. खरेतर देशव्यापी संचारबंदीमुळे पोस्ट विभागाने या पॉलिसी धारकांच्या प्रीमियम जमा करण्याच्या तारखेत वाढ केली आहे.

पोस्ट ऑफिस ने आता घरी बसून सर्वांसाठी सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध केल्या आहेत. पोस्ट विभागाच्या सर्व प्रकारच्या सेवांसाठी आपण घरी बसून अर्ज करू शकता. यासाठी आपल्याला पोस्ट विभागाचे मोबाईल ऍप किंवा पोस्ट विभागाच्या वेबसाईट वर जाऊन जी सुविधा हवी आहे त्यासाठी अर्ज करावा लागेल. पोस्ट ऑफिसच्या विभागाकडून दोन लिंक जारी करण्यात आल्या आहेत. https://play.google.com/store/apps/details?id=info.indiapost  या लिंकवरून ऍप  डाऊनलोड करता येईल.                                                                      https://indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx ही विभागाच्या वेबसाईटची लिंक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment