रोहित शर्माचे संघातील पुनरागमन होणार कठीण ! सराव सुरू करण्यापूर्वी द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच क्रिकेट विश्वासही त्याची झळ बसलेली आहे. या धोकादायक साथीमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे आणि यामुळे क्रिकेटर्स घरातच दोन महिने बसून आहेत. जरी आता खेळाडूंनी आउटडोर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. वास्तविक, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतण्याची तयारी करत होता. मात्र कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्याला ते शक्य होऊ शकलेले नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर आपण संघात परतण्यास तयार असल्याचे रोहितने नुकतेच म्हटले आहे.

न्यूझीलंड दौर्‍यावर जखमी
रोहितला फेब्रुवारीमध्ये न्यूझीलंडच्या दौर्‍यावर दुखापत झाली होती त्यामुळे त्याला दौरा अर्धवट सोडून माघारी परतावे लागले. त्यांनी ला लिगाच्या फेसबुक पेजवर लिहिले की, ‘लॉकडाउनपूर्वी मी संघात परत यायला मी पूर्णपणे तयार होतो. संपूर्ण आठवडाभर माझी फिटनेस टेस्ट होणार होती, मात्र नंतर लॉकडाउन सुरु झाले आणि आता मला पुन्हा नव्याने फिटनेस द्यावी लागेल. तो म्हणाला,’ की सर्व काही उघडल्यानंतर मला एनसीएमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. केवळ ती टेस्ट पास केल्यावरच मी भारतीय संघासह सराव करण्यास सक्षम होऊ शकेन. महाराष्ट्र सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये असलेल्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय वैयक्तिक सराव करण्यास परवानगी दिली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध टी -२० मालिकेच्या पाचव्या सामन्यात विराट कोहली ऐवजी कर्णधारपद सांभाळणारा रोहित शर्मा शेवटच्या टी -२० सामन्यात जखमी झाला होता. रोहित शर्मा भारतीय डावाच्या १७ व्या षटकात दुखापतग्रस्त झाला. रोहित शर्माने सोधीच्या चेंडूवर षटकार ठोकताच त्याच्या मांडीचे स्नायू खेचले गेले. या सामन्यात तो ६० धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर रिटायर्ड हर्ट झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.