पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपताच आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी विविध पक्षांकडून सुरु झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतली असून, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पवार यांचा दुसरा नातू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. रोहित पवार यांनी प्रथमच याबाबत जाहीर व्यक्तव्य केलं. विधानसभा लढवण्यास मी इच्छुक आहे. मात्र माझा मतदारसंघ ठरला नसून वरिष्ठ ठरवतील, तिथून उभं राहणार असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय.
रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघात चाचपणी करत आहेत. इथे त्यांनी पाण्याचे टँकरही सुरु केले आहेत. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढलाय. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे. तर जामखेडला आमच्याच विचारांचा आमदार निवडून येईल आणि राज्यात आमची सत्ता येईल, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.
आजोबा शरद पवार यांच्या ईव्हीएमचा गैरवापर झाल्यास लोकशाहीवरील विश्वास उडेल यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांना पवारांवर बोलल्यावर प्रसिद्ध मिळते. त्यांच्या विधानाचा मसाला अर्क काढल्याचा दावा त्यांनी केलाय, तर या संदर्भात नेटवर्क जॅमर, टॉवर बंद करता येईल का, यावर विचार करणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. दरम्यान, रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास त्यांना रॅम शिंदेंचं मोठं आव्हान असणार आहे.
दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?
जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…
शरद पवारांच्या गुगली समोर पृथ्वीराज चव्हाण क्लीन बोल्ड
शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले