हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालघर तालुक्यात 8 तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही चुकीची बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भिमाचे… नाही काही कामाचे, अशा टीका त्यांनी कवितेतून केली.
तसेच मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी आपण केली असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली. यावेळी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, रिपाइंचे सुरेश बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, राम जाधव, सतीश बोर्डे, नंदा मोरे, तेजश्री मोरे, इंदिरा दोंदे, साक्षी बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’