वृत्तसंस्था । आर्क्टिक सर्कलमधील नदीत २०,००० टन तेल गळती झाली आहे. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. सायबेरियन शहराजवळील पावर प्लांटमधील इंधनटाकी कोसळल्यामुळे ही गळती झाली होती. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी या घटनेची माहिती २ दिवस उशिरा दिल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. नॉरिलस्क निकेलची सहाय्यक कंपनी या प्लांट ची मालक कंपनी आहे. पुतीन यांनी दूरदर्शनवर प्रतिक्रिया देताना या कंपनीच्या प्रमुखांवर टीका केली आहे. आणि याला ते जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.
त्यांनी सरकारला इतक्या उशिरा या घटनेची माहिती का मिळाली? आम्ही सोशल मीडियावरून या घटनेची माहिती घ्यायची का? असे प्रश्न या कंपनीच्या प्रमुखांना विचारले आहेत. पुतीन यांना या क्षेत्रातील राज्यपाल यांना या घटनेची माहिती सोशल मीडियावरून मिळाल्याची माहिती दिली होती. यावर नॉरिलस्क निकेल यांनी आम्ही वेळेत आणि अगदी योग्य पद्धतीने माहिती दिल्याचे सांगितले आहे. पुतीन यांनी यावर कारवाई करण्याचे तसेच या वीज प्रकल्पाच्या प्रमुखाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत.
Russian President Vladimir Putin has declared a state of emergency in a region of Siberia after an estimated 20,000 tons of diesel fuel spilled from a power plant storage facility and fouled waterways: Associated Press (File pic) pic.twitter.com/zTNlbCS5EJ
— ANI (@ANI) June 4, 2020
हा अपघात या इंधनटाकीला आधार देणारे खांब बुडाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. वातावरणातील उबदारतेमुळे पर्माफ्रॉस्टवर बांधलेला हा परिसर वितळत असल्याची माहिती आहे. यामुळे ३५० चौरस किमी परिसर दूषित झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक पर्यावरणीय गटांनी गळती प्रमाण आणि नदीचे भौगोलिक क्षेत्र पाहता ती साफ करणे कठीण असल्याचे म्हंटले आहे. नॉरिलस्क निकेल यांचे याआधीही अशा प्रकरणांमध्ये नाव आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.