“एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनात आज विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सरकारला घेरले. यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर घणाघाती टीका केली. “नवाब मलिक यांच्याबाबत सभागृहात विषय निघाल्यास त्याचे उत्तर कोण देणार तुरुंगात बसलेले मलिक. मलिक हे निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्यांना मंत्री काय मुख्यमंत्रीही करा की. मात्र, एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही”, अशी घणाघाती टीका खोत यांनी केली.

मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात विरोधक आक्रमक झाल्यामुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर भाजप आमदार सदाभाऊ खोत याणी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली. ते म्हणाले की, “राज्याच्या हिताच्या दृष्टीने अधिवेशनात काही निर्णय होत असतात. अशात जर एखादा मंत्री तुरुंगात असेल आणि त्यांचा विषय सभागृहात उपस्थित होत असेल. तर त्याला उत्तर काय मंत्री तुरुंगातून देणार काय? निर्दोष सिद्ध झाल्यानंतर नंतर त्याला मंत्री काऊ मुख्यमंत्रीही करा की तुम्हाला कोणी अडवले आहे.”

मात्र, एक एक मंत्री तुरुंगात जायला लागले तरी यांना लाज वाटत नाही. एका बाजूला ओबीसी आरक्षण न्यालयाने फेटाळला आहे. त्यामुळे असे दिसते कि हे पांढऱ्या पायाचे सरकार आहे, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकावर केली आहे.