“जे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतात, त्यांच्याशी शिवसेना आघाडी करणार नाही”: संजय राऊतांचा विरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडी जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही.त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत शिवसेना आघाडी करणार नाही,” असे राऊत यांनी म्हंटले.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, शिवसेना हा शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श असतो. ते महाराष्ट्राचे आदर्श होऊच शकत नाहीत. ते शिवसेनेचे आदर्श होऊच शकत नाहीत. त्यामुळे एमआयएम आघाडीत येणार या अफवा आहेत. एमआयएम आणि भाजपची छुपी युती आहे.

वास्तविक पाहता एमआयएम ही भाजपची बी टीमच आहे. हे उत्तर प्रदेशात पार पडलेल्या निवडणुकांवरून स्पष्ट झाले आहे. ज्यांना भाजपचा पराभव उत्तर प्रदेशात करायचा होता तर त्यांनी काळजीपूर्वक पावले टाकायला हवी होती. इम्तियाज जलील हे खासदार आहेत. दिल्लीत आमची त्यांच्याशी भेट होते. कुणासोबत भेट झाली म्हणजे आघाडी झाली असे होत नाही. महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे. चौथा त्यात येणार नाही. तीनच राहील, असेही यावेळी राऊत स्पष्ट केले.

Leave a Comment