हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे मला माहिती नाही. राजकारणात आपण एकमेकांशी नेहमी बोलत असतो, चर्चा करत असतो, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपांवर दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, मात्र आज ते उपमुख्यमंत्री आहेत आणि किती काळ या पदावर राहतील हे सांगता येत नाही. हे सर्व दिल्लीच्या मर्जीप्रमाणे आहे. फडणवीसांनी या सनसनाटीचा आनंद घ्यावा.
महाराष्ट्रात ज्यावेळी राजकीय स्थित्यंतर, घडामोडी घडत होती. त्यावेळी फडणवीस विरोधी पक्षनेते होते. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होते तेव्हा अशावेळी विरोधी पक्ष किंवा सरकार बनवू इच्छिता त्यांच्याशी बोलले असतील, बोलले होते. ठीक आहे, पण देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत,” असा प्रश्न राऊतांनी यावेळी केला.