दोन-चार पादरेपावटे फुसफुसले की आग लागत नाही, मुख्यमंत्र्यांवरील टिकेवरून राऊतांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या आजारपणामुळे बैठका, कार्यक्रमांना उपस्थिती लावू शकत नाहीत. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी अनुपस्थिती लावली होती. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील इतर नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा चार्ज दुसऱ्यांना देण्याबाबत सल्ले दिले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. “दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाबाबत महत्वाचे वक्तव्य केले. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा, ही राहुल आणि प्रियांका यांची इच्छा आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या टिकण्याबाबत आणि उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून विरोधकांच्याकडून केल्या जात असलेल्या टीकेचा राऊतांनी चांगलाच समाचार घेतला. सध्या विरोधी पक्षातील दोन चार पादरे पावटे फुसफूसत आहेत. त्यांच्या फुसफूसल्याने महाविकास आघाडी सरकारला आग लागत नाही.

उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. कालही त्यांनी शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांशीही झूमद्वारे त्याच्याकडून संवाद साधला जातो. फायलींवर सह्या होत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या जात आहे. राज्यावर लक्ष आहे. त्यामुळे कोण काय बोलत आहे आणि काय करत आहे याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, अशा टोलाही यावेळी राऊतांनी लगावला.

Leave a Comment