हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध दिवंगत मराठी दिगदर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. आत्महत्येच्या आधी 2 दिवस नितीन देसाई दिल्लीत भाजप नेत्यांना भेटले. त्यांनी आपल्या कर्जाची मुदत वाढवून मागितली, पण त्यांना वाचवलं नाही. मग नितीन देसाई दिल्लीतून परत इकडे आले आणि त्यांनी आत्महत्या केली असं संजय राऊत यांनी म्हंटल आहे. तसेच सनी देओलच कर्ज वाचवलं, त्याला एक न्याय आणि नितीन देसाई याना वेगळाच न्याय अस का? असा थेट सवालही संजय राऊत यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सनी देओल भाजपचे खासदार आहेत. त्यांनी 60-70 कोटी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला. बँकेने त्यासंदर्भात नोटीस काढली, ऑक्शन पुकारलं. पण 24 तासामध्ये दिल्लीतून काही सूत्र हल्ली आणि लिलाव थांबावला गेला. सनी देओल आणि त्यांच्या बंगल्याला वाचवण्यात आलं मग हाच न्याय नितीन देसाई यांना का देण्यात आला नाही. सनी देओल भाजप खासदार, स्टार प्रचारक असल्यामुळे महाराष्ट्राच्या नितीन देसाईंना वेगळा न्याय का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.
नितीन देसाई २ दिवसांपूर्वी आपला स्टुडिओ वाचवण्यासाठी आणि आपल्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाचवण्यासाठी दिल्लीमध्ये अनेक भाजपच्या नेत्यांना भेटले होते”. माझं जे स्वप्न आहे ते वाचवा असं म्हणत त्यांनी त्याठिकाणी डोळ्यातून पाणी सुद्धा काढले, पण त्यांना वाचवलं नाही. मग ते दिल्लीतून परत इकडे आले आणि त्यांनी आत्महत्या केली, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं. सनी देओल तुमचा स्टार प्रचारक आहे म्हणून त्याला वेगळा न्याय आणि नितीन देसाईला वेगळा न्याय का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.