हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालायच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे तत्पूर्वी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच अजित पवार यांच्यासोबत 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी पार पडला असा मोठा गौप्यस्फोट केला. फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच 72 तासात सरकार कोसळले नसते, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत फडणवीसांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मी काय बोलू अगोदरच जगात आठ आश्चर्य आहेत. दोन दिल्लीत बसले आहेत आणि हे महाराष्ट्रातील दहावं आश्चर्य आहे. किती खोटं बोलावं माणसाने. मुळात यांनीच विश्वासघात केला आहे. जे अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद देण्याचे मान्य केले होते. फडणवीसांनी हॉटेल ब्लु सी मध्ये जे वक्तव्य केले होते ते एकदा पहावे.
सत्तेचं वाटप 50-50 टक्के हा त्यांचाच शब्द होता. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनीच विश्वासघात केल्यावर इतर कोणी विश्वासघात केला आमचा असे बोलण्याला आता आगळा काढण्यात काय अर्थ आहे? अजून ते पहाटेच्या शपथविधीतुन बाहेर पडलेले नाहीत. उद्या ते असेही म्हणतील कि सहा महिन्यापूर्वी जो शपथविधी झाला जातो शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाला असेही ते म्हणतील. वास्तविक फडणवीस वैफल्यग्रस्त आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या सरकारविषयी अत्यंत तिरस्कार आणि घृणास्पद असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
माझा 2 वेळा विश्वासघात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरेंकडून झाला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढवल्या आणि नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आघाडी केली. त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. त्यांनतर उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर चर्चा करत होते. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली होती की, आम्हाला स्थिर सरकार हवं आहे. आम्ही शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या.
जेलमध्ये टालाव ही तर फडणवीसांचीच इच्छा : संजय राऊत
चोराच्या मनात चांदणं, या म्हणीसारखं देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. त्यांच्या मनातच भीती होती. काहीतरी चुकीचं केलंय, असं त्यांना सारखं वाटत राहतं. पहाटेच्या शपथविधीच्या आठवणीने तर त्यांना दचकून जाग येते. एवढंच नाही तर मविआच्या काळात पोलिसांनी जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी फडणवीस यांचीच इच्छा होती, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.