एक शरद… सगळे गारद… शरद पवारांच्या मुलाखतीचा टिझर चर्चेत 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली होती. या मुलाखतीचा टिझर त्यांनी आज आपल्या ट्विटर वरून प्रसिद्ध केला आहे. एक शरद… सगळे गारद अशा शीर्षकाखालील हा टिझर चांगलाच आला आहे. शरद पवार यांची मुलाखत म्हणून या मुलाखतीची विशेष आतुरता वाचकांना तसेच प्रेक्षकांना लागून राहिली आहे. टिझर मुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले होते की, कोरोनापासून इतर घटनांविषयी अशा अनेक विषयांवर पवार अगदी मोकळेपणाने बोलले आहेत. टिझर मध्ये राऊत यांनी महाविकास आघाडी सोबत, कोरोना, राममंदिर, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारलेले  आहेत. पवारही अगदी मोकळेपणाने  उत्तरे देताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा म्हणून पवारांच्याकडे बघितले जाते आहे. सध्या महाविकास आघाडी बद्दल अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे या मुलाखतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. 

https://twitter.com/rautsanjay61/status/1280697533027794944  

या मुलाखतीचे तीन भाग डिजिटल माध्यमातून तसेच शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रसिद्ध केले जाणार आहेत. ११ जुलै ला मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. १२ व १३ जुलै ला अनुक्रमे दुसरा व तिसरा भाग प्रकाशित होणार आहे. सर्वानाच याची प्रतीक्षा आहे. राऊत यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत बरीच गाजली होती. त्यामुळे या मुलाखतीचीही मोठी चर्चा होते आहे. आता प्रत्यक्ष मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर या मुलाखतीतील विविध आयाम पाहता येणार आहेत.